महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेत गुरुवारी (21 जून) सायंकाळी 12 वा सामना खेळला जाईल. पुणेरी बाप्पा आणि सोलापूर रॉयल्स संघ यात एकमेकांशी भिडणार आहेत. पुणेरी बाप्पा संघाकडे या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये जागा बनवण्याची संधी असेल. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाच्या या चार खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल.
ऋतुराज गायकवाड-
भारतीय संघासाठी खेळणारा पुणेरी बाप्पाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्याकडून संघाला पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्याच्या नेतृत्वात पुणे संघ स्पर्धेत शानदार कामगिरी करताना दिसला आहे. ऋतुराजने पहिल्या तीनही सामन्यात वादळी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा बनवले आहेत. पहिल्या व तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावण्यात त्याला यश आलेले. तीन सामन्यात त्याच्या बॅटमधून 143 धावा निघाल्या आहेत.
पवन शहा-
पुणेरी बाप्पाचा सलामीवीर पवन शहा या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून आक्रमक फटकेबाजी करताना दिसला. कलात्मक तसेच ताकदवर फटके मारताना त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत सलग दोन अर्धशतके त्याच्या नावे नोंद आहेत. कर्णधार ऋतुराज पाठोपाठ त्याच्या बॅटमधून देखील पुणे संघासाठी 141 धावा आलेल्या दिसतात.
पियुष साळवी-
पुणेरी बाप्पा संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून युवा पियुष साळवी याने छाप पाडली आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यांमध्ये अनुक्रमे तीन, दोन व तीन असे बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. वेग आणि नियंत्रण याच्या जोरावर तो सध्या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. सोलापूरविरुद्ध संघाला विजय मिळवायचा झाल्यास त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करून दाखवावी लागेल.
रोहन दामले-
अष्टपैलू म्हणून पुणेरी बाप्पा संघासाठी रोहन दामले तीनही सामन्यात चमकलेला आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी तसेच डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा रोहन संघासाठी उपयुक्त ठरताना दिसतोय. त्याने गोलंदाजी करताना आत्तापर्यंत पाच बळी आपल्या नावे केले असून फलंदाजीत, वेळोवेळी चांगली कामगिरी केली आहे.
(These Four Players Might Play Viral Role For Puneri Bappa In MPL Against Solapur Royals)
महत्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! एमपीएलमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंचा सन्मान, दिला Womens Cricketच्या इतिहासाला उजाळा
IPLमध्ये फ्लॉप, पण T20 ब्लास्टमध्ये सुपरहिट, करनने 18 चेंडूत ठोकली फिफ्टी; पाहा 63 सेकंदाचा व्हिडिओ