नुकताच इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम संपन्न झाला. गुजरात टायटन्सने यावर्षी विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. आयपीएलनंतर भारतासमोर पहिले आव्हान दक्षिण आफ्रिकेचे आहे. ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या टी-२० मालिकेसाठी आफ्रिका संघ भारतात दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिका संघात चांगले फलंदाज तर आहेतच, पण गोलंदाजी आक्रमण ही त्यांची खरी ताकद म्हणावी लागेल. आपण या लेखात त्यांच्या संघातील चार गोलंदाजांची माहिती घेणार आहोत, जे आगामी मालिकेत भारतीय फलंदाजांसाठी घातक ठरू शकतात.
१. कागिसो रबाडा
वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) दक्षिण आफ्रिका संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये महत्वपूर्ण प्रदर्शन करत आला आहे. आयपीएल २०२२मध्येही त्याने चांगले प्रदर्शन केले. त्याने या हंगामात २३ विकेट्स घेतल्या आणि यादरम्यान धावांवर देखील लगाम लावली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४० टी-२० सामन्यांमध्ये ४९ विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध त्याने आतापर्यंत फक्त चार टी-२० सामने खेळले आहेत आणि यामध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत.
२. तबरेज शम्सी
टी-२० विश्वचषकातील क्रमांक एकचा गोलंदाज तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) आगामी मालिकेत भारतीय फलंदाजांसाठी घातक ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. हा डावखुरा फिरकी गोलंदाज मागच्या काही महिन्यांमध्ये जगभरातील फलंदाजांसाठी मोठी बाधा ठरला आहे. तो आयपीएलमध्ये जरी नसला खेळला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा धाक कायम आहे. ४७ टी-२० सामन्यात ५७ विकेट्सची नोंद त्याच्या नावापुढे आहे. त्याच्या गोलंदाजीतील खास बाब म्हणजे त्याच्याकडे धावांवर लगाम लावण्याचे कौशल्य आहे. त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ६.७८ आहे. यावर्षाच्या सुरुवातीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत त्याने चांगले प्रदर्शन केले होते.
३. केशव महाराज
शम्सीप्रामाणेच आफ्रिकी संघाकडे अजून एक फिरकी गोलंदाज आहे, जो टी-२० क्रिकेटमध्ये प्रभाव टाकत आहे. त्याचे नाव म्हणजे केशव महाराज (Keshav Maharaj). या अनुभवी फिरकी गोलंदाजाने मागच्या वर्षी आफ्रिकी संघासाठी टी-२० पदार्पण केला आणि आतापर्यंत फक्त ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ६ विकेट्स मिळाल्या आहेत. परंतु धावा खर्च करण्याचा बाबतीत तो संघासाठी खूपच फायदेशीर ठरला आहे. त्याने अवघ्या ५.८२च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय मालिकेत महाराज देखील भारतीय फलंदाजांसाठी प्रमुख बाधा ठरला होता.
४. एन्रीच नॉर्किया
यादीत चौथे नाव आहे वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) याचे. आफ्रिकी संघातील हा सर्वात वेगवान गोलंदाज गतीसोबतच त्याचा चेंडू स्विंग देखील करू शकतो. तसेच, घातक बाउंसर चेंडूने फलंदाजांवर सहजासहजी दबाव बनवू शकतो. सध्या तो फिटनेसशी झगडत असला, तरी आगामी मालिकेच्या दृष्टीने त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आयपीएल २०२२मध्ये तो संघाला महागात पडला होता, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे प्रदर्शन वेगळ्याच दर्जाचे असते. आतापर्यंत त्याने १६ टी-२० सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहेत आणि यादरम्यान ताचा इकॉनॉमी रेट ६.७५ राहिला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
IPL 2022मध्ये सापडलं भारताचं भविष्य; ‘ही’ आहे टीम इंडियाची सर्वोत्तम अनकॅप्ड प्लेइंग इलेव्हन
‘मुंबई संघात निवड होणे वेगळे आणि…’, अर्जुनला एकही सामना न खेळण्याबाबत प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
पदार्पणातील पहिल्याच षटकात केन विलियम्सनची विकेट काढणारा मॅथ्यू पॉट्स नक्की आहे तरी कोण?