नुकतेच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांनी लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली. आयेशाने मंगळवारी (७ सप्टेंबर) इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट करत माहिती दिली. आयेशा ही भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. धवन आणि आयेशा यांनी २००९ मध्ये साखरपुडा उरकला होता, त्यानंतर २०१२ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते.
आयेशा आणि धवन यांना एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव जोरावर आहे. तसेच आयेशाचे धवन सोबत हे दुसरे लग्न होते, या आधी आयेशाने ऑस्ट्रेलियाच्या एका व्यावसायिकाशी लग्न केले होते. त्याच्याकडून आयेशाला दोन मुली देखील आहेत. धवन आणि आयेशा यांच्या हसत्या खेळत्या संसारात अशी दुःखद घटना घडल्यामुळे चाहत्यांनी यावर दुःख व्यक्त केले.
मात्र, धवन हा भारतीय संघातील असा पहिला खेळाडू नाही, ज्याचा घटस्फोट झाला आहे. याआधीही भारतीय संघाचे असे काही खेळाडू राहिले आहेत ज्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नव्हते, त्यातीलच म्हणजे.
मोहम्मद अजहरुद्दिन –
भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिनचे देखील लग्न फार काळ टिकू शकले नव्हते. अझरुद्दीनचे पहिले लग्न त्याची पूर्व पत्नी नौरीन सोबत झाले होते. दोघांनीही १९८७ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर ९ वर्षांनी १९९६ मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. वृत्तानुसार त्यांच्या वेगळे होण्याचे कारण अझरुद्दीन आणि सिनेमा जगतातील अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्यातील संबंध समजले जाते.
दिनेश कार्तिक –
दिनेश कार्तिक भारतीय संघाचा अत्यंत उत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र, दिनेश कार्तिकचे देखील पहिले लग्न अपयशी राहिले होते. दिनेशने २००७ साली त्याचे पहिले लग्न निकीताबरोबर केले होते. यानंतर लगेचच २०१२ मध्ये दिनेशने आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. याला सर्वात मोठे कारण म्हणजे, दिनेशची पूर्व पत्नी निकिता आणि त्याचा मित्र म्हणजेच मुरली विजय यांच्यातील संबंधामुळे दोघेही वेगळे झाले. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय दोघेही तमिळनाडूकडून क्रिकेट खेळायचे. त्यावेळी हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. नंतर निकिता आणि विजय यांनी लग्न केले.
जवागल श्रीनाथ –
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज ज्याने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर अनेक फलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली होती. जवागल त्यांच्या कारकीर्दीत अत्यंत यशस्वी असे गोलंदाज होते. मात्र, संसारिक दृष्टीने ते तितकेसे यशस्वी राहिले नाही. १९९९ साली जवागल यांनी जोस्ना सोबत लग्न केले होते. जे २००७ पर्यंत चालले त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.
विनोद कांबळी –
विनोद कांबळीचे संसारिक जीवन देखील त्याच्या क्रिकेट कारकीर्द प्रमाणेच अपयशी राहिले. त्याने १९९८ साली नोएला लुईस सोबत लग्न केले होते. यानंतर दोघांचाही आपापसातील विचारानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या –
–गेल्या ८५ वर्षात भारताने मँचेस्टरचे मैदान एकदाही केले नाही काबीज; अशी आहे ओल्ड ट्रॅफर्डवरील एकूण कामगिरी
–मी ‘वन डायमेंशनल खेळाडू’ नव्हे तर उत्कृष्ट अष्टपैलू; टी२० विश्वचषकासाठी कृणालने ठोकली दावेदारी
–“जर मला तेव्हा ड्रॉप केले नसते, तर राहुल द्रविडसह अन्य दिग्गज खेळाडू समोर आले नसते”