---Advertisement---

लढाई कोरोनाविरुद्धची! ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी टोचून घेतली कोरोनाची लस, पाहा संपूर्ण यादी

On: बुधवार, मे 12, 2021 6:35 PM
---Advertisement---

भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आयपीएल २०२१ देखील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. यामुळे देश-विदेशातील खेळाडू आपापल्या घरी परत गेले आहेत. या कठीण काळात भारतीय खेळाडू देखील आपल्या घरी वेळ घालवत आहेत. सोबतच काही प्रमुख खेळाडूंनी कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण देखील करून घेतले आहे. इंग्लंड दौर्‍यावर जाण्यापूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, इशांत शर्मा, शिखर धवन यांचा समावेश आहे.

१) विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पहिल्या लसीचा डोस घेतला. त्यानंतर विराटने देशवासीयांना लवकरात लवकर लस टोचून घेण्याचे आवाहन केले.

२) जसप्रीत बुमराह
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लस टोचून घेतल्यानंतर देशवासीयांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला.

३) चेतेश्वर पुजारा
भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने आपली पत्नी पूजा हिच्यासोबत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्याने देशवासीयांना शक्य होईल तितक्या लवकर लस टोचून घेण्यास सांगितले.

https://twitter.com/cheteshwar1/status/1391722606286438400?s=19

४) अजिंक्य रहाणे
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानेदेखील आपली पत्नी राधिका हिच्यासोबत लस टोचून घेतले. केवळ स्वतःसाठी नाही तर आजुबाजुच्या लोकांच्या सुरक्षेसाठी ही लस घेतल्याचे त्याने सांगितले.

५) शिखर धवन
धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन हा कोरोनाची लस देणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होता. त्याने लस घेतल्यानंतर रुग्णसेवेत काम करणाऱ्या फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.

६) ईशांत शर्मा
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने आपली पत्नी प्रतिभा हिच्यासोबत लस घेतली. या दाम्पत्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले होते.

७) उमेश यादव
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेला वेगवान गोलंदाज उमेश यादव याने देखील ही लस टोचून घेतली. तसेच शक्य तितक्या लवकर लस घेण्याचे आवाहन देखील केले.

भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघातील क्रिकेटपटू लसीचा पहिला डोस घेत आहेत. दुसरा डोस त्यांना इंग्लंडमध्ये देण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ ची ‘फ्लॉप इलेव्हन’ पाहून घ्या, भल्याभल्या टी२० स्टार्सचा आहे समावेश

“मला चेन्नईतही संधी दिली नाही, मी खरचं इतका वाईट आहे का?” भारतीय गोलंदाज हळहळला

“पहाटे मोठा धमाका झाला आणि.‌‌..”, वॉर्नरने सांगितली मालदीवमधील आपबीती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---