---Advertisement---

आयपीएलचे ‘हे’ पाच विक्रम तोडणे अशक्य, वैभव सूर्यवंशीसाठी मात्र शक्य

On: सोमवार, मार्च 30, 2026 6:13 PM
---Advertisement---

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ च्या हंगामात आज (३० मार्च) त्याचा पहिला सामना खेळणार आहे. त्याने मागील हंगामात ७ सामने खेळताना धमाकेदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे यंदा तो कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असणार आहे. आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. वैभवला संपूर्ण हंगाम खेळण्याची संधी आहे. यामुळे त्याला आयपीएलचे हे मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे.

क्रिस गेलच्या नाबाद १७५ धावा – आयपीएलच्या इतिहासात पहिल्या हंगामात ब्रेंडन मॅक्युलमने १५८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये क्रिस गेलने १७५ धावांची नाबाद खेळी करत मॅक्युलमचा आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रम मागे टाकला. १४ वर्ष या विक्रमाच्या जवळपासही कोणी पोहोचला नाही, मात्र वैभवला हा विक्रम मोडण्याची संधी असून त्याने बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात त्याला हा विक्रम मोडायचा आहे, असे वक्तव्यही केले होते.

आयपीएलमध्ये एका षटकात सहा षटकार – आंतरराष्ट्रीय स्तरावर एका षटकात ६ षटकार मारले आहेत, मात्र आयपीएलमध्ये कोणीही एका षटकात ६ षटकार मारलेले नाही. तसे आयपीएलमध्ये एका षटकात ५ षटकार मारले गेले आहेत, मात्र मागील १८ हंगामात एका षटकात ६ षटकार मारले गेलेले नाहीत. वैभवला हा विक्रम करण्याची संधी आहे.
आयपीएलमध्ये गेलने २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियविरुद्ध राहुल शर्माला पाच षटकार, राहुल तेवातियाने २०२० मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध शेल्डन कॉट्रेल याला ५ षटकार, २०२१ मध्ये रवींद्र जडेजाने रॉयल चॅळेंजर्स बंगळुरूविरुद्ध हर्षल पटेलला ५ षटकार, २०२३ मध्ये रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्ध यश दयाल याला ५ षटकार आणि २०२५ मध्ये रियान परागने केकेआरविरुद्ध मोईन अलीला एका षटकात ५ षटकार मारले होते.

एका डावात सर्वाधिक षटकार – गेलने २०१३ मध्ये खेळलेल्या नाबाद १७५ धावांच्या खेळीमध्ये १७ षटकार मारले होते. दुसरीकडे वैभवने त्याच्या कारकिर्दीत एका डावात १५ षटकार मारले आहेत, त्यामुळे त्याच्याकडे गेलचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

सर्वाधिक स्ट्राईक रेट – एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेटचा विक्रम जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या नावावर आहे. त्याने २०२४ मध्ये नऊ सामन्यांमध्ये एकूण १४१ चेंडूंचा सामना करत २३४.३४ चा स्ट्राइक रेट नोंदवला आहे. हा विक्रम वैभव मोडू शकतो? त्याने गेल्या हंगामातील सात सामन्यांमध्ये १२२ चेंडूंचा सामना करत २०६.५५ चा स्ट्राइक रेट नोंदवला होता.

एका हंगामात सर्वाधिक षटकार – एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याने २०१२ मध्ये आरसीबीकडून खेळताना ५९ षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर केकेआरच्या आंद्रे रसेल याचा क्रमांक लागतो. त्याने २०१९ च्या हंगामात ५२ षटकार मारले आहेत. दुसरीकडे वैभवने मागील हंगामातील ७ सामन्यांतच २४ षटकार मारले होते. यामुळे यंदाच्या हंगामात त्याच्याकडे हा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---