---Advertisement---

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक, रोहित शर्माचाही आहे समावेश

On: मंगळवार, एप्रिल 2, 2019 3:43 PM
---Advertisement---

मोहाली। आयपीएल 2019 मध्ये सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना पार पडलेल्या सामन्यात पंजाबने 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंजाबच्या युवा क्रिकेटपटू सॅम करनने विकेटची हॅट्रिक करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 11 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यात त्याच्या हॅट्रिकचा समावेश आहे. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिल्लीच्या हर्षल पटेलला बाद केले. त्यानंतर पुन्हा 20 षटकात गोलंदाजीला येत पहिल्या दोन चेंडूवरच अनुक्रमे कागिसो रबाडा आणि संदिप लामिछाने यांना बाद करत आयपीएल 2019मधील पहिली हॅट्रिक केली.

तो आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा एकूण 15 वा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच करन हा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू देखील ठरला आहे. त्याने जेव्हा ही हॅट्रिक घेतली तेव्हा त्याचे वय 20 वर्षे 302 दिवस एवढे होते.

यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध 2009 मध्ये 22 वर्षे 6 दिवस एवढे वय असताना विकेट्सची हॅट्रिक घेतली होती.

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक अमित मिश्राने घेतली आहे. त्याने तीन वेळा हा कारनामा केला आहे. तसेच युवराज सिंगने 2 वेळा हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही हॅट्रिक त्याने 2009 मध्ये घेतल्या आहेत. अन्य 13 गोलंदाजांनी प्रत्येकी एक वेळा हॅट्रिक घेतली आहे.

या खेळाडूंनी घेतली आहे आयपीएलमध्ये विकेट्सची हॅट्रिक –

2008 – लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, मखाया एनटिनी

2009 – युवराज सिंग(दोन वेळा), रोहित शर्मा

2010 – प्रविण कुमार

2011 – अमित मिश्रा

2012 – अजित चंडिला

2013 – सुनील नारायण, अमित मिश्रा

2014 – प्रविण तांबे, शेन वॉटसन

2016 – अक्षर पटेल

2017 – सॅम्यूएल बद्री, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट

2019 – सॅम करन

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल: युवराज सिंग, सॅम करनच्या बाबतीत घडला हा खास योगायोग

आठवण – भारताच्या विश्वविजयाची

गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment