भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ही जोडी कमाल करताना दिसत आहे. रोहित आणि द्रविड यांनी घेतलेले बरेचसे निर्णय भारतीय संघासाठी फायदेशीर ठरले आहेत. अगदी द्रविड यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनल्यानंतर अनुभवी खेळाडूंना अधिकाधिक खेळवण्याचा घेतलेला निर्णयही योग्य ठरताना दिसत आहे. आशिया चषक २०२२ साठी निवडल्या गेलेल्या १५ सदस्यीय संघातही याची झलक पाहायला मिळते. त्यातही द्रविडमुळे २ वरिष्ठ खेळाडूंची टी२० कारकीर्द वाचली असून त्यांना सातत्याने संघात संधी मिळत आहेत.
टी२० विश्वचषक २०२१ (T20 World Cup 2021) साठी भारतीय संघात फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची निवड करण्यात आली नव्हती. परंतु टी२० विश्वचषकानंतर द्रविड (Rahul Dravid) आणि रोहितच्या (Rohit Sharma) जोडीकडे भारतीय संघाची सूत्रे आली आणि त्यांनी चहलवर विश्वास दाखवला. तेव्हापासून चहलला सातत्याने भारताच्या टी२० संघात जागा मिळत असून तो कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या अपेक्षांवर खराही उतरत आहे. त्याने टी२० विश्वचषक २०२१ नंतर १३ टी२० सामने खेळताना १६ विकेट्स घेतल्या आहेत.
असेच काहीसे दिनेश कार्तिकबाबतही (Dinesh Karthik) झाले आहे. २०१९ सालच्या टी२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत नव्हत्या. मात्र आता तो टी२० संघातील प्रमुख खेळाडू बनला आहे. आशिया चषक २०२२ साठीही त्याला १५ सदस्यीय संघात निवडले गेले आहे. २०२१ टी२० विश्वचषकानंतर भारताकडून १५ टी२० सामने खेळताना त्याने २१.३३ च्या सरासरीने १९२ धावा केल्या आहेत.
फिरकीपटू आर अश्विनलाही गतवर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळत आहेत, तो येत्या आशिया चषकाचाही भाग आहे. यांबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि विस्फोटक सलामीवीर शिखर धवन यांच्यासाठीही मर्यादित षटकांच्या संघाचे दरवाजे उघडे झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे फक्त धोनीच करू शकतो!’ विमानतळावर दाखवलेल्या साधेपणाचे सर्वत्र होतंय कौतुक
घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा
भारतासाठी धोक्याची घंटा! झिम्बाब्वेच्या कर्णधाराचे १४ वर्षांत पहिलेच शतक, षटकार-चौकारांचा पाडला पाऊस