---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023साठी भारत, अफगाणिस्तानबरोबर ‘हे’ सहा संघ पात्र; दोन चॅम्पियन्स संघाना करावे लागणार श्रम

On: सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 12:27 PM
Virat Kohli & Rashid Khan
---Advertisement---

अफगाणिस्तानचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून दुसरा सामना रविवारी (27 नोव्हेंबर) खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला. यातील पहिला सामना अफगाणिस्तानने 60 धावांनी जिंकल्याने ते मालिकेत 1-0 असे आघाडीवर आहे. ही मालिका आयसीसी वनडे विश्वचषक सुपर लीगमध्ये गणली जाते. यामुळे या सामन्याचा जो निकाल लागला त्याचा परिणाम लीगच्या गुणतालिकेत दिसला. ज्यामध्ये अफगाणिस्तानला फायदा झाला.

वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जाणार आहे. त्यामुळे भारत आधीच स्पर्धेस पात्र ठरला आहे. तर श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 5-5 अंक मिळाले. यामुळे अफगाणिस्तानने गुणतालिकेत सातवे स्थान गाठले आणि विश्वचषकास पात्रताही मिळवली. आयसीसीने वनडे विश्वचषकासाठी पात्र झालेल्या संघांची नावे जाहीर केली आहे. त्यामध्ये भारत, अफगाणिस्तानबरोबर न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.

लीगच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर भारत असून त्यांनी 20 सामन्यात 134 अंक मिळवले आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंड असून त्यांनी 18 सामन्यात 125 अंक आणि 17 सामन्यात 125 अंक मिळवत न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील कोणत्याही दोन संघाला स्पर्धेस पात्र होण्याची क्वालिफायर फेरी खेळावी लागणार आहे. लीगच्या गुणतालिकेत पहिले आठ संघ विश्वचषकाच्या मुख्य फेरीसाठी थेट पात्र होणार आहेत. त्या गुणतालिकेत पहिले सात स्थान ज्या संघांनी गाठले ते सर्व संघ पात्र ठरले असून आता केवळ एकच जागा शिल्लक आहे. ज्यासाठी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात चुरस दिसणार आहे. यामधील श्रीलंकेने एकदा आणि वेस्ट इंडिजने दोनदा वनडे विश्वचषक जिंकला आहे.

https://twitter.com/ICC/status/1597078977155211264?s=20&t=YO2b_Uk0Eku-KXTlutnarg

या लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडविरुद्ध तीन आणि नेदरलॅंड्स विरुद्ध दोन वनडे सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेने या लीगमधील आतापर्यंत 20 सामने खेळले असून त्यांंचे चार सामने बाकी आहेत. हे चारही सामने ते जिंकले तरच ते स्पर्धेसाठी पात्र होणार आहे. त्यासाठी त्यांना न्यूझीलंडला 3-0 असे पराभूत करावे लागणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना जो जिंकेल त्याला 10 गुण मिळतील. यामुळे हा सामना जिंकणे श्रीलंकेसाठी महत्वाचा आहे. ‘These’ six teams qualify for ODI World Cup 2023 along with India, Afghanistan

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WC2022: मेस्सी, रोनाल्डोवर भारी पडला कॅनडाचा फुलबॉलपटू! नोंदवला ऐतिहासिक गोल, व्हिडिओ पाहाच
पावसामुळे सामना गेला वाया! तरीही अफगाणिस्तानला मिळाले 2023 वर्ल्डकपचे तिकीट, श्रीलंकेच्या वाढल्या अडचणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---