आयपीएल २०२१ साठी प्लेऑफमधील ४ संघ पक्के झाले आहेत. रविवारपासून (१० ऑक्टोबर) हंगामातील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर दोन दिवसांनी १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाला सुरुवात होईल.
विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा याआधीच झाली होती. या संघातील अनेकांनी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. असे असले तरी, काही खेळाडू असे आहेत ज्यांना विश्वचषकासाठी संधी मिळाली होती. पण त्यांचे आयपीएलधील प्रदर्शन खूपच खराब आहे. अशात टी-२० विश्वचषकापूर्वी १० ऑक्टोबरला भारतीय संघात होणाऱ्या शेवटच्या बदलामध्ये या खेळाडूंना संघातून वगळण्यात येऊ शकते. या लेखात आपण अशा तीन खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्या विश्वचषकासाठी निवडले गेले होते. पण आयपीएलमधील खराब प्रदर्शनामुळे त्यांना भारतीय संघातून बाहेर केले जाऊ शकते.
या तीन खेळाडूंचा होऊ शकतो टी२० विश्वचषकातून पत्ता कट!
१. राहुल चाहर
राहुल मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा खेळाडू राहिला आहे. आयपीएल २०२१ मध्ये मात्र, त्याला संघासाठी काही खास प्रदर्शन करता आले नाही. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात त्याची गोलंदाजी खूपच सुमार राहिली आहे आणि त्याने धावाही जास्त दिल्या आहेत. राहुलला टी-२० विश्वचषकात दिग्गज फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या जागी संधी दिली गेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील त्याच्या खराब फार्ममध्ये मुंबईने इंडियन्सने त्याला काही सामन्यामध्ये प्लेइंग इलेव्हनमध्येही सामील केले नाही.
राहुलने यावर्षी आयपीएलमध्ये ११ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ४३ षटके टाकली आहेत. यादरम्यान त्याने २४.४६ ची सरासरी आणि ७.३९ च्या इकोनॉमीने ३१८ धावा देत फक्त १३ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात त्याने एका सामन्यात २७ धावा दिल्या आणि ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि हे त्याच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन राहिले. राहुलने भारतीय संघासाठी आतापर्यंत ५ टी२० सामन्यात १९.५७ च्या सरासरीने आणि ७.६१ च्या इकोनॉमीने ७ विकेट्स मिळवल्या आहेत. यादरम्यान त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन १५ धावा देत ३ विकेट्स घेण्याचे आहे.
२. वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्तीने आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी समाधानकारक कामगिरी केली आहे. त्याने हंगामात १४ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ५६ षटके टाकली आहेत. या षटकांमध्ये त्याने २२.७५ च्या सरासरीने आणि ६.५० च्या इकोनॉमीने ३६४ धावा दिल्या आणि १६ विकेट्स घेतले आहेत. त्याने ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ३०.५ च्या सरासरीने आणि ५.३ च्या अप्रतिम इकोनॉमीने २ विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरला प्लेऑफमध्ये पोहचवण्यासाठी चक्रवर्तीने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. असे असले तरी, चक्रवर्ती टी-२० विश्वचषकात खेळेल याबाबत शंका उपस्थित झाली आहे.
चक्रवर्तीला केकेआरसीठी आयपीएलमध्ये खेळताना दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम चक्रवर्तीवच्या गुडघ्याच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण जर तो लवकर दुखापतीतून सावरला नाही, तर त्याला विश्वचषकातून बाहेर केले जाऊ शकते.
हार्दिक पांड्या
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. फिटनेसच्या कारणास्तव त्याने जास्त गोलंदाजीही केलेली नाही. आयपीएल २०२१ च्या संपूर्ण हंगामात त्याचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे आणि त्याने मुंबईसाठी हंगामात एकही चेंडू फेकलेला नाही. हार्दिकला टी २० विश्वचषकात अष्टपैलूच्या भूमिकेत संघात संधी दिली गेली आहे, पण त्याच्या फिटनेसमुळे तो गोलंदाजी करू शकेल याबाबत शंका उपस्थित होत आहेत. हार्दिक खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला विश्वचषकासाठी संधी दिल्यामुळे निवडकर्त्यांनाही प्रश्न विचारले जात आहे. हार्दिकला संघात संधी देण्यासाठी चांगल्या फॉर्ममध्ये असलेले शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर यांना मुख्य संघात संधी देण्याऐवजी संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये सामील केले गेले आहे.
हार्दिकने आयपीएलच्या चालू हंगामातील १२ सामन्यांमधील ११ सामन्यांमध्ये २ वेळा नाबाद राहिला आहे. त्याने या हंगामात १४.११ च्या सरासरीने आणि ११३.३९ च्या स्ट्राइक रेटने केवळ १२७ धावा केल्या केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ४० धावांची आहे. हंगामात त्याने एकूण ११ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. अशात बीसीसीआय हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुल ठाकुरला विश्चषकासाठीच्या मुख्य संघात संधी देऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई वि. दिल्ली संघांचे हेड टू हेड रिकॉर्ड, बघा पहिल्या क्वालिफायरमध्ये कोणाचं पारडं दिसतंय जड?
पहिल्या क्वालिफायरमध्ये गुरू-शिष्य बनणार ‘विक्रमवीर’, धोनी करणार अनोखा विक्रम तर रिषभ रचणार इतिहास