---Advertisement---

सिक्सर किंग! कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ ३ भारतीयांनी ठोकलेत सर्वाधिक षटकार

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 1:47 AM
VIRENDER-SEHWAG
---Advertisement---

क्रिकेटमध्ये कसोटीच्या स्वरूपाला एक वेगळेच महत्त्व आहे. इथे फलंदाजाला आपले कौशल्य दाखवण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. या प्रकारात धावा करण्याची कसलीही घाई केली जात नाही आणि फलंदाज आरामात खेळपट्टीवर टिकून खेळू शकतो. असे असले तरी, असेही काही फलंदाज आहेत, जे कसोटी क्रिकेटमध्ये देखील आक्रमक खेळी करत षटकार आणि चौकार खेचतात.

काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. सध्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टी-२० क्रिकेटच्या स्वरूपामुळे फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये देखील आक्रमक शैलीने खेळताना दिसून येतो. याच कारणामुळे कसोटी क्रिकेटमध्ये देखील आपणाला अनेक षटकात लागलेले दिसून येतात. तसेच असेही काही खेळाडू होते, जे टी-२० स्वरूप येण्याआधी ही आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखले जायचे.

यात जागतिक स्तरावरील क्रिकेटपटूंचे नाव घ्यायचे झाल्यास प्रामुख्याने ॲडम गिलख्रिस्ट, सनथ जयसूर्या आणि क्रिस गेल यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश होतो. हे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याच आक्रमकतेने खेळायचे, आणि यांना त्यांच्या आक्रमक खेळीसाठीच ओळखले जायचे. तर भारतीय संघात देखील असे अनेक फलंदाज होते, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपला आक्रमक पवित्रा घेत षटकार लगावले होते.

आज आपण अशाच ३ भारतीय फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत. यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपली आक्रमक खेळी करत, सर्वाधिक जास्त षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला होता.

वीरेंद्र सेहवाग (९१ षटकार) –
भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागला मुळातच त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखले जायचे. क्रिकेटचे कोणतेही स्वरूप असू दे, सेहवागची एकच खेळण्याची शैली असायची ती म्हणजे आक्रमक खेळी. सेहवाग जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या ३०० धावांच्या नजीक पोहोचला होता. तेव्हा देखील त्याने एक जोरदार षटकार लगावत ३०० धावा करण्याचा किर्तिमान केला होता.

सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १०४ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने ८५८६ धावा केल्या होत्या. तसेच सेहवागने १०४ सामन्यांमध्ये एकूण ९१ षटकार लगावले होते. त्यामुळे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मरणाऱ्यांच्या यादीत सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे.

महेंद्रसिंग धोनी (७८ षटकार) –
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने ९० कसोटी सामने खेळले होते. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून २०१४ साली निवृत्ती घेतली होती. मात्र, या दरम्यानही धोनीने कमाल केली होती. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने आपला नैसर्गिक खेळी केली होती. धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने तब्बल ७८ षटकार लगावले होते.

सचिन तेंडुलकर (६९ षटकार) –
या यादीत ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणवला जाणारा सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटमधील जवळपास अनेक मोठे विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. कसोटीमध्ये त्याने तब्बल १६,००० धावांचा टप्पा पार केला आहे. ज्यामध्ये तेंडुलकरने ५१ शतक देखील लगावले होते. सचिनने क्रिकेट कारकिर्दीत तब्बल २०० कसोटी सामने खेळले होते. या दरम्यान ३२९ डावांमध्ये त्याने एकूण ६९ षटकार लगावले होते. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांमध्ये सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या –

–टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करताना निवड समीतीने घेतले ‘हे’ ३ धक्कादायक निर्णय
–टी-२० विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघाची घोषणा; ४१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला दिले स्थान
–‘या’ ३ खेळाडूंना टी२० विश्वचषकालाठी भारतीय संघात स्थान न देणे ठरू शकते घोडचूक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---