भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या देशात भारताची दोन पथके खेळताना दिसतील. विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरा संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांची मालिका खेळेल.
सध्या इंग्लंडमध्ये असलेला युवा सलामीवीर शुबमन गिल हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्याजागी दुसरा सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ याने इंग्लंडला जावे अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) इच्छा आहे. त्यामुळे सध्या श्रीलंकेत असलेला शॉ इंग्लंडला गेला तर श्रीलंकेविरुद्ध सलामीवीर म्हणून शिखर धवनच्या साथीला कोण मैदानात उतरेल?, याविषयी उत्सुकता लागली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण त्याच तीन पर्यायांविषयी जाणून घेऊया.
२) ऋतुराज गायकवाड
मागील वर्षभरात ज्या युवा खेळाडूची सर्वाधिक चर्चा झाली, त्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याला शॉच्या जागी सलामीला संधी देण्यात येऊ शकते. आयपीएल २०२० पासून प्रसिद्धीझोतात आलेल्या ऋतुराजने आयपीएल २०२१ मध्ये देखील दमदार कामगिरी केली. त्याने आत्तापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत १३ सामने खेळताना ३६.४० च्या अप्रतिम सरासरीने ५ अर्धशतकांसह ४०० धावा जमविल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १२४.६० असा राहिला.
३) देवदत्त पडिक्कल
आयपीएल २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार पटकावणार्या देवदत्त पडिक्कल याला त्यानंतर २०२१ आयपीएलमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे बक्षीस म्हणून श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळाली. पृथ्वी शॉ इंग्लंडला गेल्यास शिखर धवनच्या जागी त्याला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्यात येऊ शकते. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २१ सामने खेळताना ६६८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३१ असा शानदार राहिला आहे.
३) इशान किशन
गेली तीन-चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इशान किशन याला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत तुफानी अर्धशतक झळकावले होते. आयपीएलमध्ये देखील तो मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर म्हणून भूमिका बजावत असतो. त्यामुळे पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत त्याला सलामीवीर म्हणून पहिली पसंती मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
ओली रॉबिन्सनच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा, ८ सामन्यांची बंदी असूनही भारताविरुद्ध खेळणार
मंदीत चांदी! बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपटूंची वाढवणार पगार, एका दिवसाचे मिळणार ६० हजार
‘कधी गल्ली क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी न केलेले लोक विराटला सल्ले देत आहेत,’ पाकिस्तानी यष्टीरक्षक भडकला