वेस्ट इंडीज संघाला धूळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (team India) श्रीलंकेविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मलिकेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होणार आहेत, तर कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होईल. कसोटी मालिकेसाठी जो भारतीय संघ घोषित केला गेला, त्यामध्ये अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांना वगळले गेले आहे. या दोघांना संघातून बाहेर केल्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे.
चेतेश्वर पुजारा मागच्या मोठ्या काळापासून कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आला आहे. परंतु, आता संघातून बाहेर झाल्यानंतर त्याची जागा खाली झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने अनेकदा मोठी खेळी केली आहे. अशात आता पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी कोणत्या खेळाडूला संधी मिळते, हे पाहावे लागणार आहे. चला तर नजर टाकुया अशा तीन खेळाडूंवर, जे पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतात.
१. केएल राहुल (KL Rahul) –
केएल राहुल अलिकडच्या काळात भारताच्या सलामीवीर फलंदाजाच्या रूपात नावारुपाला आला आहे. पहिल्या क्रमांकावर त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. तसेच जेव्हा कधी त्याला दुसऱ्या कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवले गेले, तेव्हाही त्याचे प्रदर्शन चांगलेच राहिले आहे. राहुल मागच्या मोठ्या काळापासून भारतीय संघाचा नियमित खेळाडू आहे. फलंदाजांमध्ये तो एक महत्वाचा खेळाडू आहे.
अशात कर्नाटकचा हा २८ वर्षीय फलंदाज पुजाराच्या जागी कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो. संघाकडे मयंक अगरवाल आणि शुभमन गिल यांच्या रूपात दोन चांगले सलामीवीर फलंदाज आहेत, जे रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतात आणि राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
२. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) –
श्रेयस अय्यरने अलिकडेच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने शतक ठोकले होते. त्याची कसोटी कारकीर्द अजून खूपच छोटी आहे, पण यादरम्यान त्याने महत्वाच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.
श्रेयस संघासाठी मोठी खेळी करू शकतो आणि परिस्थितीनुसार स्वतःच्या खेळीत बदलही करू शकतो. २७ वर्षीय हा फलंदाज संघाने सलामीवीरांच्या स्वस्तात विकेट्स गमावल्यानंतर टिकून खेळू शकतो. अशात संघ व्यवस्थापण पुजाराच्या जीग तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यासाठी श्रेयसच्या नावावर विचार करू शकते.
३. हनुमा विहारी (Hanuma Vihari) –
हनुमा विहारीला एक उत्कृष्ट खेळाडू आहे, पण त्याला अपेक्षित संधी मिळालेल्या नाहीत. विहारी तो फलंदाज आहे, ज्याने खालच्या फळीतील खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. हनुमा विहारीला जेव्हा कधी संधी मिळाली आहे, त्याने त्याचे सोने केले आहे.
त्याच्या छोट्याशा कसोटी कारकिर्दीत विहारीने जबरदस्त गुणवत्ता दाखवली आहे, ज्याची कसोटी क्रिकेटमध्ये खूपच आवश्यकता असते. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याने संघासाठी चांगले प्रदर्शन केले होते. त्याने आतापर्यंत संघासाठी केलेली कामगिरी पाहता, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रमुख दावेदार आहे.