भारतीय क्रिकेट संघ सध्या मायभूमीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहेत. या मालिकेनंतर लगचेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यावर उभय संघ २ सामन्यांची टी२० मालिका खेळणार असून या मालिकेसाठी बुधवारी (१५ जून) १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित युवा खेळाडूंचा संघ या दौऱ्यावर जाणार आहे. अशात या संघाची सलामी जोडी जवळपास निश्चित आहे.
आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी (T20 Series) भारतीय संघात (IND vs IRE) ३ सलामीवीरांचा (Team India Openers) समावेश करण्यात आला आहे. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)यांचा यात समावेश आहे. हे तिघेही आयपीएलमध्ये आपापल्या संघांसाठी सलामीवीराची भूमिका बजावतात. इशान मुंबई इंडियन्सचा विश्वासू सलामीवीर आहे. तर युवा ऋतुराजनेही मागील २ वर्षांतील कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याचे सलामीचे स्थान निश्चित केले आहे.
वेंकटेश अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीला फलंदाजी करताना २०२१ चा हंगाम गाजवला होता. परंतु २०२२ च्या हंगामात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. याच पार्श्वभूमीवर वेंकटेशला भारतीय संघाकडून सलामीला संधी मिळण्याची कमी शक्यता आहे.
India Squad
Hardik Pandya (C), Bhuvneshwar Kumar (vc), Ishan Kishan, Ruturaj Gaikwad, Sanju Samson, Suryakumar Yadav, Venkatesh Iyer, Deepak Hooda, Rahul Tripathi, Dinesh Karthik (wk), Yuzvendra Chahal, Axar Patel, R Bishnoi, Harshal Patel, Avesh Khan, Arshdeep Singh, Umran Malik— BCCI (@BCCI) June 15, 2022
त्यातही सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चालू असलेल्या टी२० मालिकेत इशान, ऋतुराजसह वेंकटेशला निवडले गेले आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या तिनही सामन्यात भारतीय संघव्यवस्थापनाने वेंकटेशला बाकावर बसवून ठेवले आहे. तर इशान आणि ऋतुराज या सलामी जोडीवर संघ विश्वास दाखवताना दिसत आहे. त्या दोघांनी संघाचा विश्वास सार्थकी लावत संघाला मालिकेतील पहिलावहिला विजय मिळवून देण्यात मोलाचे सहकार्यही केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ऋतुराज आणि इशानमध्ये पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाली होती. तसेच दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही केली होती, ज्याच्या जोरावर भारतीय संघाने ४८ धावांनी हा सामना जिंकला होता.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
महत्त्वाच्या बातम्या-
‘कधी दिवस चांगले…’, भारतासाठी पहिले अर्धशतक ठोकल्यानंतर ऋतुराजने सांगितले खेळीमागील रहस्य
फॉर्मात नसलेल्या रोहित-विराटचं पुढे काय होणार, टी२० विश्वचषकातून डच्चू मिळेल का?
इंग्लंड दौऱ्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह, दुखापत ठरलीय कारण