लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसरा हंगाम यावर्षी भारतात खेळवला जाणार आहे. मागच्या वर्षी कोरोना महामारीदरम्यान, ही स्पर्धा ओमानमध्ये खेळली गेली होती. आगामी हंगाम यावर्षी २० सप्टेंबरपासून खेळला जाईल. स्पर्धेत विरेंद्र सेहवाग, डेल स्टेन, जॅक कॅलिस यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. आता या लीगमध्ये भारताचे दोन माजी दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफ आणि आरपी सिंग सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) दुसऱ्या हंगामाच्या आयोजकांनी याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. माहितीनुसार मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि आरपी सिंग (RP Singh) दुसऱ्या हंगामात खेळणार आहेत. तत्पूर्वी अनेक दिग्गजांची नावे या हंगामासाठी निश्चित केली गेली आहे. आरपी सिंग यापूर्वी २००७ साली भारताच्या टी-२० विश्वचषकविजेत्या संघाचा भाग राहिला आहे.
प्रज्ञान ओझा, रीतिंदर सोढी, अशोक डिंडा, पार्थिव पटेल, वीरेंद्र सहवाग, इरफान पठान, यूसुफ पठान, हरभजन सिंह, आस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली, महान स्पिनर मुथैया मुरलीधरन आणि विश्व कप विजेत्या इंग्लंड संघाचा माजी कप्तान इयोन मोर्गन देखील यावर्षी या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
लीजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा हंगामा पहिल्या हंगामापेक्षा काही प्रमाणात वेगळा असणार आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेत तीन संघ खेळले होते. परंतु यावर्षी चार नवीन संघ लीगमध्ये सहभागी होतील, असी दाट शक्यता आहे. हे चारली संघ प्रायवेट कंपन्यांकडून खरेदी केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. लीग सुरू होण्यापूर्वी संघाची निवड ही ड्राफ्ट पद्धतीने केली जाईल. ड्राफ्टमध्ये निवडले जाण्यासाठी ११० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू उपलब्ध असतील.
स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू होणार असून. लीगचा अतिम सामना १० ऑक्टोबरपर्यंत खेळला जाईल. मागच्या वर्षी या लीगचा अंतिम सामना वर्ल्ड जायंट्स आणि आशिया लायंस यांच्यात खेळला गेला होता. हा सामना वर्ल्ड जायंट्सने २५ धावांनी जिंकला होता आणि लीजेंड्स लीग क्रिकेटचा पहिला विजेता संघ देखील ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताचा आणखी एक गोलंदाज काऊंटी क्रिकेटमध्ये घालतोय धुमाकूळ, करतोय लक्षवेधी कामगिरी
वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप देण्यासाठी भारताची नवी ‘स्ट्रॅटर्जी!’ संघात ‘हे’ महत्वाचे बदल होणार
तिसऱ्या वनडेत धवन दाखवणार पावर, बाउंड्रीवर बाउंड्री मारत विश्वविक्रम करणार नावावर!