पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा हे सातत्याने आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते अनेक खुलासे करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांना त्यांच्या एका महागड्या कारविषयी विचारण्यात आले. याबाबत उत्तर देताना त्यांनी एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मध्ये अनेक महत्त्वाचे बदल होताना दिसून आले. यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे पीसीबीचे प्रमुख असलेल्या राजा यांनाच आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर ते सातत्याने अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना त्यांनी आपल्याला जीवे मारण्यात येणार होते असे देखील म्हटले.
राजा यांना मुलाखतीत ते वापरत असलेल्या अतिशय महागड्या कारविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले,
“ही कार पीसीबीची आहे. मी ती विकत घेतलेली नाही. माझ्यानंतर पीसीबी प्रमुखांनाही त्याचा वापर करता येईल. मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. म्हणूनच मी त्या बुलेटप्रुफ गाडीतून फिरत होतो. त्या धमकीबद्दल मी जास्त माहिती देऊ शकत नाही. मात्र, मार्च 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर कधी आला होता, तेव्हाची ही बाब आहे. डीआयजी सर माझ्या घरी आले आणि त्यांचा संपूर्ण रिपोर्ट तयार झाला. त्यामुळे मी ती गाडी घेतली.”
रमीझ राजा हे पीसीबी अध्यक्ष या पदावरून बाजूला झाल्यानंतर नाराज झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी नवे अध्यक्ष नजम सेठी यांच्यावर देखील आरोप केले आहेत. तसेच आपल्याला अपमानित करून बाजूला केल्याचे त्यांनी म्हटले.
(They threatened to kill me Disclosure of Rameez Raja)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला आता सुट्टीच नाही! 2023मध्ये आशिया चषक, वर्ल्डकपसह खेळणार तब्बल ‘इतके’ सामने
पंतबाबत मोठी अपडेट! उपचारांचा चांगला परिणाम, रोहितही बोलला डॉक्टरांशी