आता थेट ट्रम्प यांनीच उद्घाटन केलंय म्हटल्यावर स्टे़डियमही तसेच असणार

आज अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये तयार झालेल्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ‘मोटेरा स्टेडियम’वर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रिकेट स्टेडियमबद्दल खास गोष्टी –

-या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव दिले आहे. या स्टेडियमला मोटेरा स्टेडियम असेही म्हटले जाते. या स्टेडियमवर 1984ला पहिला वनडे सामना झाला होता. त्यानंतर 2015 ला जूने स्टेडियम पाडून तिथेच नवीन स्टेडियम बांधण्यात आले. आता हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरले आहे.

-हे नवीन मोटेरा स्टेडियम जवळजवळ 63 एकर जागेत बनले आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत.

-या स्टेडियमची आसनक्षमता 1 लाख 10 हजार एवढी आहे.

-या नवीन स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये 25 जणांची आसन क्षमता आहे.

-या स्टेडियममध्ये 55 खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे.

– तसेच या स्टेडियममध्ये 3 प्रॅक्टीस ग्राउंड, 1 इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.

-हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे 700 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

-स्टेडियम बनवणाऱ्या कंपनीने (L&T) असा दावा केला आहे की स्टेडियममध्ये अशा एलईडी दिवे लावण्यात आले आहेत की ज्यामुळी खेळाडूंची सावलीही कमी पडेल.

त्याचबरोबर या स्टेडियमची पार्किंग सुविधाही चांगली असून. एकावेळी येथे 3000 कार आणि 10 हजार दुचाकी वहाने पार्क केली जाऊ शकतात.

-या स्टेडियमच्या जून्या मैदानात काही खास विक्रम भारतीय खेळाडूंनी केले आहे. त्यातील उल्लेखनीय म्हणजे सुनील गावसकरांना 10 हजार कसोटी धावांचा टप्पा याच मैदानात पार केला होता. तर कपिल देव यांनी रिचर्ड हेडली यांना मागे टाकत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम याच मैदानात खेळताना केला होता.

You might also like