जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. तरीही निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितवर विश्वास ठेवला. निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा करत रोहितकडेच कर्णधारपद ठेवले आहे. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
चेतेश्वर पुजारा, उमेश यादव यांसारख्या खेळाडूंना ताफ्यात जागा मिळाली नाहीये, तर मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला विश्रांती दिली आहे. वेस्ट इंडिज (West Indies) मालिकेसाठी निवडकर्त्यांनी काही युवा खेळाडूंवरही विश्वास दाखवत त्यांना पहिल्यांदाच कसोटी किंवा वनडे संघात स्थान दिले आहे. तसेच, काही खेळाडू दीर्घ काळानंतर पुनरागमन करण्यात यशस्वी झाले आहेत.
1. यशस्वी जयसवाल
प्रत्येक खेळाडूचे देशाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. खूप कमी खेळाडूंचे हे स्वप्न पूर्ण होते. त्यात युवा फलंदाज यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याचाही समावेश आहे. जयसवालला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. 21 वर्षीय जयसवालने आयपीएल 2023मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून शानदार प्रदर्शन करत एकूण 14 सामन्यात 163.61च्या स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश असतो. विशेष म्हणजे, त्याला पहिल्यांदाच भारतीय संघात सामील करण्यात आले आहे.
2. ऋतुराज गायकवाड
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा राखीव खेळाडूंमध्ये निवडला गेला होता. मात्र, लग्नामुळे त्याने आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर त्याच्या जागी यशस्वी जयसवाल हा राखीव खेळाडू म्हणून संघासोबत लंडनला गेला होता. आता ऋतुराजला पहिल्यांदाच कसोटी संघात जागा मिळाली आहे. तसेच, वनडे संघातही त्याचे पुनरागमन झाले आहे.
3. संजू सॅमसन
यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. संजूला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळाली नव्हती. संजूने 2022मध्ये एकूण 10 वनडे सामने खेळले होते. त्यात त्याने 71च्या सरासरीने 284 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 100च्या आसपास होता.
4. मुकेश कुमार
वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. मुकेश जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये सामील होता. बिहारच्या मुकेश कुमारने आतापर्यंत 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 149 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 24 सामन्यात 26 विकेट्सची नोंद आहे.
5. नवदीप सैनी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दोन वर्षांनंतर कसोटी संघात परतला आहे. 30 वर्षीय नवदीप सैनीने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2021मध्ये ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आता सैनी या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल. (this 5 indian cricketer got chance in team india sqaud for west indies tour know here)
महत्वाच्या बातम्या-
शमीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर, लगेच वाचा
टीम इंडियात निवड झाल्यानंतर आली यशस्वीची प्रतिक्रिया, म्हणाला, “त्या तिघांकडून खूप शिकलो”