इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील प्लेऑफ सामन्यांना मंगळवारपासून (दि. २४ मे) सुरुवात होत आहे. यातील क्वालिफायर- १ सामना सायंकाळी ७.३० वाजता गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सघात खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता येथील प्रसिद्ध ईडन गार्डन्स स्टेडिअममध्ये रंगणार आहे. गुजरात संघ सर्वाधिक २० गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे, १८ गुणांसह राजस्थान संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
गुजरात आणि राजस्थान (GTvsRR) संघात होणाऱ्या क्वालिफायर- १ सामन्यात जो संघ विजय मिळवेल, त्याला थेट अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. दुसरीकडे, पराभूत होणाऱ्या संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळण्याची आणखी एक संधी मिळेल. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात आणि राजस्थान संघात एकापेक्षा एक खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. यातील काही खास खेळाडू आहे, ज्यांच्यावर चाहते आणि त्यांच्या संघांची नजर असेल. या लेखातून आपण त्याच ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
गुजरात आणि राजस्थान संघातील ५ महत्त्वाच्या खेळाडूंवर असेल नजर
१. जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
आयपीएल २०२२मध्ये सर्वात कोणता खेळाडू चमकला असेल, तर तो म्हणजे जोस बटलर (Jos Buttler) होय. बटलरने १४ सामन्यात ३ शतके आणि ३ अर्धशतकांसह १४६.९६च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ६२९ धावा चोपल्या आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप आपल्याकडे ठेवणारा बटलर मागील काही सामन्यात अपेक्षित कामगिरी करू शकला नाहीये. मात्र, गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात तो खास खेळाडू ठरू शकतो.
२. हार्दिक पंड्या (गुजरात टायटन्स)
यंदाच्या हंगामात साखळी सामन्यांमध्ये ४०३ धावा चोपणारा गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याच्याकडूनही संघाला अपेक्षा असतील. मात्र, मागली सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध धमाकेदार अर्धशतकी खेळी करणारा गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने तोही मोठी खेळी करू शकतो, हे दाखवून दिले आहे. तो पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानच्या समस्या वाढवू शकतो. त्याने आतापर्यंत हंगामात आपल्या संघासाठी सर्वाधिक ४१३ धावा चोपल्या आहेत. या धावा त्याने ४१.३०च्या सरासरीने चोपल्या आहेत.
३. युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये जोस बटलरसह युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचेही योगदान आहे. तो सतत शानदार कामगिरी करताना दिसत आहे. याव्यतिरिक्त तो यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत. या विकेट्स त्याने ७.६७च्या इकॉनॉमी रेटने घेतल्या आहेत. असात गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चहल फिरकीची धुरा सांभाळू शकतो. तसेच, विरोधी संघाच्या फलंदाजांना चिंतेत टाकू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
४. राशिद खान (गुजरात टायटन्स)
सध्याच्या काळात सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये सामील असलेल्या खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खान (Rashid Khan) याचा समावेश आहे. गुजरातला राशिदकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यात त्याने ६.९४च्या इकॉनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या आहेत. तो आपल्या फिरकीने सामना पालटून टाकण्याचा दम राखतो. एवढंच नाही, तर मागील काही सामन्यात त्याला फलंदाजीचीही संध मिळाली आहे. तसेच, या खेळाडूने आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून देण्यातही मोलाचा वाटा उचलला आहे.
५. डेविड मिलर (गुजरात टायटन्स)
गुजरात टायटन्स संघाचा अनुभवी फलंदाज डेविड मिलर (David Miller) याला जेव्हाही कठीण परिस्थितीत संधी मिळाली, तेव्हा त्याने धमाकेदार खेळी करून संधीचे सोने केले. काही काळापूर्वी ज्या खेळाडूची कारकीर्द संपली असे जेव्हा लोक म्हणत होते, तेव्हा डेविड मिलर आता पुन्हा आपल्या लयीत परतला आहे. त्याने या हंगामात १४ सामने खेळताना ५४.४३च्या सरासरीने आणि १३६.०७च्या स्ट्राईक रेटने ३८१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १ अर्धशतकही झळकावले आहे. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद ९४ इतकी होती. आता मिलर राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दिनेश कार्तिकला परत संधी दिली, मग शिखर धवनला का नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचा प्रश्न
उच्चशिक्षित भारतीय शिलेदार, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…