---Advertisement---

ब्रायन लाराच्या 400 धावांचा विक्रम मोडणार! मायकल क्लार्कने सांगितले ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे नाव

On: सोमवार, जानेवारी 8, 2024 10:18 PM
Michael Clarke
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार माकयल क्लार्क याने मोठा दावा केला आहे. क्लार्कच्या मते स्टीव स्मिथ याने डेव्हिड वॉर्नर याच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर म्हणून खेळले पाहिजे. जर स्मिथ सलामीला खेळला, तर तो ब्रायन लारा यांच्या 400 धावांचा विक्रम मोडेल, असेही मायकल क्लार्क याला वाटते.

ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) नुकतीच पाकिस्तानविरुद्धची सिडनी कसोटी खेळून काढली. हा वॉर्नरच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. काही महिन्यांंपूर्वीच वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच सिडनी कसोटीच्या आधी त्याने वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घोषित केले. सलामीवीर फलंदाज निवृत्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला असा फलंदाज हवा आहे, जो वॉर्नरची कमी भरून काढेल. सलामीला खेळण्यासाठी स्टीव स्मिथ याचे नाव चर्चेत आहे. पण अनेक जाणकरी सलामीला खेळण्यासाठी स्मिथचे समर्थन केले नाहीये.

असे असले तरी, माककल क्लार्क या मताशी सहमत आहेत की, स्मिथला सलामीला खेळण्याचे आव्हान दिले पाहिजे. एसपीएनच्या एका पॉलडकास्टवर क्लार्क म्हणाला, “त्याला जर हे काम करायचे असेल, तर संधी दिली गेली पाहिजे. पॅट कमिन्सचे वक्तव्य ऐकून असे वाटते की, हा एक साधारण बदल आहे. मला वैयक्तिक असे वाटते की, कॅमरून ग्रीन डेव्हिड वॉर्नरच्या जागी डावाची सुरुवात करेल. पण स्टीव स्मिथला हे करायचे नसेल तरच. जर स्मिथला सलामीला खेळायचे असेल, तर कॅमरून ग्रीनला 4 किंवा 6 क्रमांकावर खेळावे लागू शकते.”

“स्टीव स्मिथ खूप चांगला खेळाडू आहे. जर स्मिथने सलामीला फलंदाजी केली, तर 12 महिन्यांच्या आतमध्ये तो सर्वश्रेष्ठ सलामी फलंदाज बनू शकतो. त्याने जर ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडीत काढला, तर आश्चर्य वाटायला नको. कारण त्याच्याकडे तेवढी गुणवत्ता आहे. सलामावीर झाला तर त्याच्याकडे खेळण्यासाठी संपूर्ण दिवस असेल.” दरम्यान, लारा यांनी 10 एप्रिल 2004 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नाबात 400 धावांची खेली केली होती. त्याच्याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही फलंदाज 400 धावांची खेळी करू शकला नाहीये.

महत्वाच्या बातम्या – 
अवघ्या 44 धावा करताच रोहित घडवणार इतिहास! षटकाराच्या बाबतीतही भारतीय कर्णधार टॉपवर 
पाकिस्तानला मिळालं नवं नेतृत्व! न्यूझीलंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूच्या हातात संघाची धुरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---