इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऐतिहासिक ऍशेस मालिका यावर्षी इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला, जो ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकला. दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर 28 जूनपासून सुरू होईल. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग याने आपल्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या मते ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) ऍशेसच्या दुसऱ्या सामन्यात आपली प्लेइंग इलेव्हन बदलेल, याची खूपच कमी शक्यता आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेलाडूंनी चांगले प्रदर्शन केले असून दुसऱ्या सामन्यातही हेच 11 खेळाडू खेळू शकतात, असे पाँटिंगला वाटते. “या दोन सामन्यांमध्ये आठ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे संघात बदल होईल, असे मला वाटत नाही. इतिहास पाहिला, तर ऑस्ट्रेलियाला आपल्या विजेत्या संघात आणि विजयाच्या फॉर्मूल्यात बदल करायला आवडत नाही,” अशे पाँटिंग म्हणाला.
असे असले तरी, जोश हेजलवूड (Josh Hazlewood) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांनी एजबस्टन कसोटीत कमी गोलंदाजी केल्यामुळे पाँटिंग चिंतेत आहे. हेजलवूडला ऍशेस मालिकेपूर्वी दुखापत झाली होती आणि त्याने आयपीएळ हंगाम देखील अर्ध्यात सोडला होता. अशात पाँटिंगच्या मते एकतर हेजलवूडला काहीतरी दुखापत झाली असावी, नाहीतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्याकडून कमी गोलंदाजी करून घेतली जात आहे. कॅमरून ग्रीनच्या बाबतीत मात्र, अशी कुठलीच गोष्ट नाही. ग्रीन आयपीएल हंगाम गाजवल्यानंतर ऍशेसमध्ये चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा होती. मात्र, एजबस्टनमध्ये त्याने खूपच कमी गोलंदाजी केली. पाँटिंगच्या मते दुसऱ्या डावात त्याने खूपच कमी गोलंदाजी केली. अशात संघ व्यवस्थापनाने त्याच्याजागी दुसऱ्या कोणाला संधी दिली, तर आश्चर्य वाटणार नाही.
पाँटिंगने पुढे इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनविषयी देखील मत मांडले. पहिल्या कसोटी सामन्यात त्यांचा अष्टपैलू मोईन अली याला दुखापत झाली होती. अशात विरोधी संघाला लॉर्ड्स कसोटीसाठी प्लेइगं इलेव्हनमध्ये बदल करावा वागू शकतो, असे पाँटिंग म्हणाला. दरम्यान, लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडच्या ताफ्यात 18 वर्षीय रेहान अहमद याला सामील केले गेले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (This change could happen in the Australian team in the second match of Ashes 2023)
महत्वाच्या बातम्या –
रुटवर पडला स्टोक्सच्या नेतृत्वाचा प्रभाव! म्हणाला, ‘मी जर पुन्हा कर्णधार…’
‘आता रणजी खेळणं बंद कर…’, विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांकडून सरफराजकडे दुर्लक्ष, संतापले गावसकर