---Advertisement---

इंग्लंडमध्ये ‘या’ भेदक गोलंदाजापुढे गिल करणार संघर्ष, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे WTC फायनलपूर्वी मोठे विधान

On: रविवार, जून 4, 2023 1:41 PM
Shubman-Gill
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या काही खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. यामधील एक नाव म्हणजे युवा भारतीय सलामीवीर शुबमन गिल होय. मात्र, गिलविषयी ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी खळबळजनक भाष्य केले आहे.

भारताचा 23 वर्षीय शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासाठी 2023 हे वर्षे कारकीर्दीतील सर्वोत्तम वर्षे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने शतक झळकावले आहे. तसेच, त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातही सर्वाधिक 890 धावा चोपत ऑरेंज कॅप (Orange Cap) आपल्या नावावर केली होती. मात्र, ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांच्या मते, गिल इंग्लंडच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या भेदक वेगवान गोलंदाजीपुढे तो संघर्ष करताना दिसू शकतो.

ग्रेग चॅपेल यांनी एका शोवर बोलताना गिलविषयी म्हटले की, “मला अधिक विस्तारात जायचे नाहीये, पण मला विश्वास आहे की, ऑस्ट्रेलिया संघही तिथे काही गोष्टी पाहत आहे, ज्या मी पाहत आहे. यामधील एक गोष्ट जेव्हा शुबमन गिल आपल्या डावाची सुरुवात करतो, तेव्हा तो ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर संघर्ष करताना दिसतो. अशात जर चेंडूने जराही अतिरिक्त उसळी घेतली, तर गिलला चिंतेत टाकू शकतो, पण तो एक चांगला खेळाडू आहे. जर तिथे त्याला चेंडू टाकला नाही, तर तो खतरनाक ठरू शकतो.”

मिचेल स्टार्कपुढे संघर्ष करू शकतो गिल
गिलबद्दल बोलताना चॅपेल पुढे असेही म्हणाले की, “गिल यापूर्वीही इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, तर तोदेखील इंग्लंडच्या स्थितीत संघर्ष करू शकतो. मला वाटते की, त्या स्थितीत गिल ज्या एका गोलंदाजापुढे सर्वाधिक संघर्ष करेल, तो मिचेल स्टार्क आहे. अतिरिक्त गती आणि उसळीमुळे स्टार्क खूपच प्रभावी ठरू शकतो.”

डब्ल्यूटीसी अंतिम सामना
डब्ल्यूटीसी अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल कशी कामिगरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (this former cricketer believes shubman gill will struggle against australian bowling attack in wtc final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेन स्टोक्सने रचला इतिहास! बनला 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच कॅप्टन
‘तुझ्या नोटांपेक्षा जास्त माझे…’, सेहवागचा ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरवर तिखट मारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---