प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहिती आहे की, भारताला दोन कर्णधारांनी वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यातील पहिले कर्णधार म्हणजे कपिल देव आणि दुसरा कर्णधार म्हणजे एमएस धोनी होय. मात्र, खूप अनेकांना माहिती नसेल की, आतापर्यंत विश्वचषकातील सर्वाधिक सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा कर्णधार हे दोघेही नसून भलताच कुणीतरी आहे. आपण वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हीच रंजक आकडेवारी जाणून घेणार आहोत. चला तर, सुरुवात करूयात…
विश्वचषकात कोणत्या भारतीय कर्णधाराने खेळले सर्वाधिक सामने?
भारतीय संघाने विश्वचषकात आतापर्यंत एकूण 84 सामने खेळले आहे. मात्र, यापैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा मान कपिल देव (Kapil Dev) आणि एमएस धोनी (MS Dhoni) नाही, तर मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) या खेळाडूने मिळवला आहे. या यादीत कपिल देव आणि धोनीचाही क्रमांक लागतो, पण ते दोघेही अझरुद्दीनच्या मागे आहेत.
मोहम्मद अझरुद्दीनने 1992 ते 1999 यादरम्यानच्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक 23 सामने खेळले आहेत. यातील फक्त 10 सामने जिंकण्यात संघाला यश आले आहे. याव्यतिरिक्त यादीत दुसऱ्या स्थानी आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा क्रमांक लागतो. धोनीने 2011 आणि 2015 या विश्वचषकात एकूण 17 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यामध्ये संघाला 14 सामने जिंकण्यात यश आले आहे.
याव्यतिरिक्त यादीत तिसऱ्या स्थानी भारतीय संघाला पहिले वहिले वनडे विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार म्हणजे कपिल देव आहेत. त्यांनी 1983 आणि 1987 या विश्वचषकात एकूण 15 सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. यापैकी भारताने 11 सामने जिंकले होते. यानंतर यादीतील चौथा क्रमांक सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा आहे. गांगुलीने 2003 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करताना 11 सामने खेळले होते. यातील 9 सामन्यात भारत विजय मिळवण्यात यशस्वी झाला होता.
याव्यतिरिक्त भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या यादीत पाचव्या स्थानी आहे. विराटने 2019 विश्वचषकात एकूण 9 सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. यातील 7 सामने भारत जिंकला होता. तसेच, यादीत सहाव्या स्थानी एस वेंकटराघवन असून त्यांनी 1975 आणि 1979 या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करताना एकूण 6 सामने खेळले होते. यातील फक्त 1 सामना भारत जिंकू शकला होता.
यादीतील सातवे आणि अखेरचे नाव राहुल द्रविड (Rahul Dravid ) याचे आहे. द्रविडने 2007च्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करताना फक्त 3 सामने खेळले होते. त्यात भारताने फक्त 1 सामना जिंकला होता.
वनडे विश्वचषक 2023मध्ये अपेक्षा
भारतीय संघ 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 10 वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. अशात रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून 140 कोटींहून अधिक भारतीयांना आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या आशा लागल्या आहेत. या विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या विश्वचषकातील भारतीय संघाचे अभियान 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होत आहे. (this indian captain has captained india in the maximum number of matches in the world Cup)
हेही वाचा-
भारताची विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘यंदा World Cup Trophy आपलीच’
‘संपूर्ण जग पाकिस्तानला…’, Asia Cup 2023मधून PAK संघ बाहेर पडताच कडाडला शोएब अख्तर