---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला सर्वाधिक गरज कशाची? प्रमुख खेळाडूने सांगूनच टाकले; म्हणाला…

Team-India
---Advertisement---

भारतीय संघाने रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात म्हणजेच 45व्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात भारतापुढे नेदरलँड्सचे आव्हान होते. हा सामना भारताने 160 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा स्पर्धेतील सलग 9वा विजय ठरला. भारत हा स्पर्धेतील एकमेव संघ आहे, जो एकही सामना पराभूत झाला नाही. अशात भारत उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाशी भिडेल. यापूर्वी भारतीय खेळाडूने मोठे विधान केले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील उपांत्य सामना (Semi Final) 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) येथे खेळला जाणार आहे. या सामन्याबाबत बोलताना भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने म्हटले की, उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडच्या विकेट्स लवकर घ्याव्या लागतील.

कुलदीप यादवचे विधान
“वानखेडे स्टेडिअमवर गोलंदाजी करणे कठीण आहे. उसळी चांगली आहे आणि इथे फलंदाजही आक्रमक होतात. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडे पुनरागमन करण्यासाठी वेळ असतो. मात्र, हेही खरंय की, तुम्हाला सामन्यात आघाडी घेण्यासाठी सुरुवातीच्या विकेट्सची गरज असते. त्याचवेळी तुम्ही विरोधी संघावर दबाव बनवू शकाल,” असे कुलदीप म्हणाला.

भारतीय संघाची तयारी चांगली
कुलदीपने पुढे बोलताना म्हटले की, भारताची तयारी चांगली आहे. तसेच, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारताने शानदार खेळ दाखवला आहे. भारताने साखळी फेरीतील आपले सर्व 9 सामने जिंकले आहेत. विश्वचषकाच्या पॉईंट्स टेबलमध्येही भारत अव्वलस्थानी आहे.

कुलदीप म्हणाला, “न्यूझीलंडविरुद्ध 2019 विश्वचषकाचा अंतिम सामना चार वर्षांपूर्वी झाला होता. आम्ही यानंतर अनेक द्विपक्षीय मालिका खेळल्या. आम्हाला आणि त्यांना भारतातील स्थिती माहितीये. आमची तयारी चांगली झाली आहे आणि आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगले खेळण्यात यशस्वी झालो आहोत. आशा आहे की, अशाप्रकारची लय पुढील सामन्यातही कायम ठेवू.”

खरं तर, भारत आणि न्यूझीलंड संघ यापूर्वी 2019 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही आमने-सामने होते. मात्र, त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 18 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. अशात भारतीय संघ 2023 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. (This Indian cricketer says we will need early wickets against new zealand in semif inals world cup 2023 ind vs nz)

हेही वाचा-
‘पाकिस्तान क्रिकेटची आई-बहीण…’, वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनानंतर रमीज राजांच्या तळपायाची आग मस्तकात
आपल्या गोलंदाजीने वर्ल्डकप 2023 गाजवणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय; पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---