इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपली असून भारतात पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट सुरू होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करताना दिसत आहेत. यामध्ये भारताचा शानदार फलंदाज मयंक अगरवाल याचाही समावेश आहे. मयंकने आपल्या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मयंक अगरवाल पावसात फलंदाजी करताना दिसत आहे. पावसामुळे चेंडू आणखी वेगाने त्याच्या बॅटवर येत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर, दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेला 28 जूनपासून सुरुवात होत आहे. यासाठी साऊथ झोन (South Zone) निवड समितीने मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याला उपकर्णधार बनवले आहे. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत मागील हंगामात कर्नाटक संघाकडून खेळताना मयंकने शानदा प्रदर्शन केले होते. आता दुलीप ट्रॉफीतही तो चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून त्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन होऊ शकले. यासाठी मयंक कसून मेहनत घेत आहे.
मयंकने 20 जून रोजी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तो पावसात भिजत ओल्या टेनिस चेंडूने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर तुम्ही याचा वापर स्वत:ला ट्रेनिंग देण्यासाठी केला, तर पाऊसही तुमचा खेळ खराब करू शकत नाही.”
https://www.instagram.com/reel/CttiFfgsoTv/?utm_source=ig_embed&ig_rid=cba0519a-2a6c-4955-9c63-e6348982ede6
जवळपास 15 महिन्यांपासून मयंक खेळला नाही भारताकडून कसोटी सामना
विशेष म्हणजे, मयंकला भारताच्या कसोटी संघातून बाहेर होऊन जवळपास 15 महिने झाले आहेत. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये मार्च, 2022मध्ये खेळला होता. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यात मयंक दोन्ही डावात एकूण फक्त 26 धावा करू शकला होता.
शुबमन गिल (Shubman Gill) याने मयंकची जागा घेत भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले आहे. आपल्या छोट्या कसोटी कारकीर्दीत त्याने अनेक शानदार खेळी साकारल्या आहेत. सध्या गिल कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करतो. मयंकला पुन्हा संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्याला लय मिळवावी लागेल. (this indian cricketer uses rain advantage bats quick deliveries nets see video)
महत्वाच्या बातम्या-
काय मॅच झाली राव! ‘या’ संघाने शेवटच्या चेंडूवर 1 विकेटने मिळवला शानदार विजय, वाचाच
अजूनही वेळ गेली नाही! ‘या’ 3 गोष्टींवर रोहितला द्यावे लागेल लक्ष, नाहीतर कर्णधारपदावरून होईल हाकालपट्टी