मुंबई । भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिनेश सेन हा चतुर्थश्रेणी पदाची सरकारी नोकरी शोधत आहे. त्याला हरियाणामध्ये नोकरी मिळाली नाही म्हणून त्याने राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा) येथे चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी अर्ज केला. तो नोकरीसाठी अर्ज करत आहे, परंतु नशीब अद्याप त्याला साथ देत नाही.
सोनीपत (आदर्श नगर) येथील रहिवासी दिनेशने सांगितले की, “त्याने अनेक वेळा हरियाणामध्ये नोकरीसाठी अर्ज केला पण त्याला यश मिळाले नाही. ”
तो म्हणाला की, ” सोनीपत जिल्हा न्यायालयात कंत्राट पध्दतीने चतुर्थश्रेणीच्या नोकरीसाठी दोनदा अर्ज केला. मुलाखती दरम्यान अधिकार्यांना आपल्या खेळातील कामगिरीविषयीही सांगितलो. मुलाखत घेतलेल्या अधिकार्यांना आनंद झाला पण मला नोकरी मिळाली नाही.”
नोकरी नसल्यामुळे कुटुंब चालवणे अवघड आहे, असे या 35 वर्षीय मुलाचे म्हणणे आहे. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, एक वर्षाचा मुलगा आणि एक वृद्ध वडील आहेत. बर्याच वर्षांपासून देशासाठी क्रिकेट खेळलेल्या दिनेशने हरियाणा सरकारमधील क्रीडामंत्री असलेले अनिल विज यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या समस्यांविषयी माहिती दिली पण त्याला काहीच उपयोग झाला नाही.
तो म्हणाला की, “नुकतेच मी राज्य क्रीडामंत्री संदीपसिंग यांनाही भेटलो आहे. राज्य क्रीडा योजनेत दिव्यांग क्रिकेटचा समावेश न केल्यामुळे कोणत्याही खेळाडूला नोकरी मिळत नाही. दिव्यांग क्रिकेटचा राज्य क्रीडा योजनेत समावेश करण्यासाठी मी सचिन तेंडुलकर, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि अन्य क्रिकेटपटूंकडून सहकार्य मागितले आहे. मला भविष्यात येणार्या खेळाडूंसाठी काम करायचे आहे. दिव्यांग क्रिकेटपटूंना इतर खेळातील खेळाडूंप्रमाणे सुविधा मिळावी, अशी माझी इच्छा आहे.”
दिनेश 12 वी उत्तीर्ण आहे. तसेच त्याने आयटीआयची पदवी घेतली आहे. तो सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सौरव गांगुली व्हावा आयसीसीचा अध्यक्ष, श्रीलंकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार क्रिकेटचे नियम; भारताच्या या पंचाने केले नियमांचे भाषांतर
ट्रेंडिंग लेख-
यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा






