---Advertisement---

कोहली-पोलार्डच्या विकेटमुळे ४८ वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात घडला अजब विक्रम

On: गुरूवार, डिसेंबर 19, 2019 3:12 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। काल(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 107 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड त्यांच्या खेळीच्या पहिल्याच चेंडूवर बाद (गोल्डन डक) झाले.

त्यामुळे वनडे क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले की एकाच सामन्यात दोन्ही संघाचे कर्णधार पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता बाद झाले.

त्याचबरोबर वनडेत 12 व्यांदा एकाच सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार शून्यावर बाद होण्याची ही घटना घडली आहे.

विराटला पोलार्डने बाद केले. विराटचा झेल रोस्टन चेसने घेतला. तसेच पोलार्डला मोहम्मद शमीने बाद केले. पोलार्डचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला.

या सामन्यात रोहित शर्माने 159 धावांची तर केएल राहुलने 102 धावांची शतकी खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने 53 धावांची खेळी केली तर रिषभ पंतने 39 धावांची छोटेखानी खेळी केली. त्यामुळे भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 387 धावा केल्या.

त्यानंतर 388 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 43.3 षटकात 280 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून निकोलास पूरन (75) आणि शाय होप (78) यांनी अर्धशतकी खेळी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---