भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (13 जानेवारी) रात्री उशिरा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर केला. यामधील न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पृथ्वी शॉला निवडण्यात आले, तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ पाहून चाहते चिढले. झाले असे की कसोटी सामन्यांसाठी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना निवडले गेले आणि सरफराज खानला का दुर्लक्षित केले? हा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे.
सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात सरफराज खान (Sarfaraz Khan) याने मुंबईकडून खेळताना 5 सामन्यात 431 धावा केल्या आहेत. त्यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. मागील हंगामात त्याने 6 सामन्यातच 122च्या सरासरीने 982 धावा चोपल्या होत्या. त्याची ही प्रभावी कामगिरी असूनही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात घेतले नाही. यावरून चाहत्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे.
ईशान किशन याला केएस भरत याचा बॅकअप म्हणून निवडले आहे. कारण रिषभ पंत हा दुखापतीतून सावरत आहे. त्याचा नुकताच कार अपघात झाला होता, यामुळे तो सहा महिने तरी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. किशनला निवडले ते योग्य, मात्र सरफराजला डालवून सूर्यकुमार का? कारण कर्णधार रोहित शर्मा याने आधीच स्पष्ट केले होते की संघनिवडताना फॉरमॅट मिक्स करणार नाही. सूर्यकुमारला कधी बदली तर इंग्लंड दौऱ्यात राखीव खेळाडू म्हणून नेले होते, आता मात्र त्याची थेट संघात निवड झाली आहे.
‘सरफराजला वगळून सूर्यकुमारला कसोटी संघात घेणे म्हणजे रणजी ट्रॉफीचा अपमान आहे. सरफराज मागील काही हंगामांपासून धावा करण्यात सातत्य राखत आहे. यामुळे त्याला एकतरी संधी देण्यात यावी. संघ निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा गोंधळात टाकले,’ असे ट्वीट एका चाहत्याने केले आहे.
Selecting Suryakumar Yadav ahead of Sarfaraz Khan in Tests is an insult to Ranji Trophy. That guy has been one of the most consistent run-getters in First Class cricket and deserved that call-up more than anyone.
Baffling selection by this committee, yet again.
— Shivani Shukla (@iShivani_Shukla) January 13, 2023
Ishan Kishan and SKY in squad,fair to say that Ranji performances have started to hold less value and public opinion has started to hold more sway.
Ishan still understandable but SKY selection is baffling and won't sent good signal to guys like Sarfaraz and Hanuma. https://t.co/q9W7Pk0tiV
— Akash (@Akashkumarjha14) January 13, 2023
सरफराजला न घेतल्याने हर्षा भोगलेंसह अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
Very hard on Sarfaraz Khan who has literally broken the door down in first class cricket. You can't do more than he has.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) January 13, 2023
If Surya Kumar Yadav can get picked to the Indian Test squad based on his recent T20I performances, then WHY not Sarfaraz Khan on his recent first-class performances in domestic games?
2019/20: 928 @ 154.66
2021/22: 982 @ 122.75
2022/23: 801* @ 89.00#INDvsAUS#INDvAUS— Mohandas Menon (@mohanstatsman) January 14, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा नेतृत्व करत असून केएल राहुल याच्याकडे उपकर्णधारपद आहे. कसोटी संघात रवींद्र जडेजा यालाही जागा दिली आहे, मात्र तो पूर्णपणे फिट असला तरच खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(This is an insult of Ranji Trophy, as Sarfaraz Khan dropped & Suryakumar Yadav included in INDvAUS Test Series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धावांचा पाऊस पाडून काही उपयोग नाही सरफराज टीम इंडियाच्या बाहेरच! सरासरीत फक्त ब्रॅडमनच्या मागे
अव्वल नंबरी मुंबई सिटी एफसीसमोर बलाढ्य प्रतिस्पर्धी एटीके मोहन बागानचे आव्हान