रविवारी (16 एप्रिल) वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्स संघाला 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. विजयासाठी केकेआरने मुंबईपुढे 186 धावांचे लक्ष्य ठेवले, जे मुंबईने 17.4 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. विशेष म्हणजे आयपीएल 2013 पासून केकेआरला मुंबईकडून मिळालेला हा सलग आठवा पराभव आहे.
आयपीएल 2013 (IPL 2013) पासून मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) संघ तब्बल 8 वेळा आमने सामने आले आहेत. या आठही सामन्यात मुंबईने वर्चस्व केले आणि विजय मिळवला आहे. केकेआरला मात्र एकही सामना जिंकता आला नाहीये. कोणत्याही संघासाठी अशी कामगिरी म्हणजे खूपच निराशाजनक आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यातील आमने सामने आकडेवारीचा विचार केला, तर मुंबईने 23वेळा, तर कोलकाताने 9 वेळा विजय मिळवला आहे.
आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत देकील मुंबई संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत मुंबई इंडियन्स पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर केकेआर आहे ज्यांनी पंजाब किंग्जविरुद्ध 20 सामने जिंकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर देखील मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 विजय मिळवले आहे. चौथ्या क्रमांकावरील सीएसकेने आरसीबीविरुद्ध 19 सामने जिंकले आहेत. यादीत पाचवा क्रमांक पुन्हा मुंबई इंडियन्सचा आहे, ज्यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 18 सामने जिंकले आहेत.
आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणे संघ
मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर (23 विजय)
केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज (20 विजय)
मुंबई इंडियन्स विरुद्ध सीएसके (20 विजय)
सीएसके विरुद्ध आरसीबी (19 विजय)
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (18 विजय)
मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर केकेआरसोबत खेळताना मुंबई इंडियन्सची आकडेवारी देखील जबरदस्त राहिली आहे. आपल्या होम ग्राउंडवर मुंबईने आयपीएळ 2008 पासून आतापर्यंत केकेआरसोबत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त एका सामन्यात मुंबईने पराभव स्वीकाला, जो 2012 मध्ये खेळला गेला होता.
वानखडे स्टेडियमवर केकेआरविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सची आकडेवारी
विजयी (2008), विजयी (2011), पराभूत (2012), विजयी (2013), विजयी (2015), विजयी (2016), विजयी (2017), विजयी (2018), विजयी (2019), विजयी (2023)*.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हायवोल्टेज’ सामन्यात राजस्थानने जिंकली नाणेफेक! गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण, अशा आहेत प्लेईंग इलेव्हन
“यशाचे क्रेडिट घेतो तशी पराभवाची जबाबदारी घे”, दिल्लीच्या पराभवानंतर पॉंटिंगवर दिग्गजाचे शरसंधान






