लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. परंतु, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाची चिंता सतावतेय. सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करत ४३२ धावांचा डोंगर उभारला.या सामन्यात इंग्लंड संघाने बलाढ्य ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. यासह एक मोठा विक्रमही केला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स आणि हमीद यांनी शतकी भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या दिवसाखेर (२५ ऑगस्ट) इंग्लंड संघाने १२० धावा केल्या होत्या.
तसेच दुसऱ्या दिवशी (२६ ऑगस्ट) कर्णधार जो रूटने १२१ धावा करत आपल्या कारकिर्दीतील २३ वे आणि मालिकेतील तिसरे शतक झळकावले. यासह ३ वर्षानंतर पुनरागमन करत असलेल्या मलानने ७० धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली. ही इंग्लंडची भारतीय संघाविरुद्ध पहिल्या डावात घेतलेली ५ वी सर्वात मोठी आघाडी आहे.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये अनेकदा अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला बॅकेफूटवर टाकले होते. आता इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाला बॅकफूटवर टाकले आहे.
यापूर्वी देखील इंग्लंडने अशी कामगिरी केली आहे. २०११ मध्ये एजबॅस्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर पहिल्या डावात ४८६ धावांची मोठी आघाडी घेतली होती. या सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवला होता. तसेच १९८४-८५ मध्ये चेन्नईच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने ३८० धावांची आघाडी घेतली होती. या सामन्यात देखील इंग्लंड संघाने विजय मिळवला होता. लीड्सच्या मैदानावर घेतलेली आघाडी ही भारतीय संघाविरुद्ध पहिल्या डावात घेतलेली पाचवी सर्वात मोठी आघाडी आहे.(This is england’s 5th highest first innings lead against India in test)
भारतीय संघाविरुद्ध इंग्लंड संघाने पहिल्या डावात घेतलेली सर्वात मोठी आघाडी
४८६ धावा – एजबॅस्टन,२०११ ( विजयी संघ – इंग्लंड)
३८६ धावा – लीड्स ,१९६७( विजयी संघ – इंग्लंड)
३८० धावा – चेन्नई ,१९८४-८५ ( विजयी संघ – इंग्लंड)
३६८ धावा – ओल्ड ट्रॅफर्ड, १९३६ ( अनिर्णीत )
३५४ धावा – लीड्स, २०२१
महत्त्वाच्या बातम्या –
तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर फाफ डू प्लेसिस उतरणार पुन्हा मैदानात; ‘या’ संघाचे करणार नेतृत्व
गेलची तोडफोड फलंदाजी! गगनचुंबी षटकाराने तोडली खिडकीची काच, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘निवडीवर भाष्य करायला आवडणार नाही’, हेडिंग्ले कसोटीत अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर शमीचे उत्तर