---Advertisement---

न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला ‘तो’ चिमुकला कोण? का होतेय किवी संघाचे कौतुक? वाचा संपूर्ण प्रकरण

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 4:45 PM
jacob cancer boy
---Advertisement---

बांगलादेशचा कसोटी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश (new zealand vs bangladesh test series) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळाला. हा मुलगा अष्टपैलू डेरिल मिचेलच्या शेजारी बसला होता. हा लहान मुलगा संघातील कोणत्या खेळाडूचा किंवा सपोर्ट स्टाफमधील कोणाचा नाहीय, तरीही त्याने न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळवला आहे.

या लहान मुलाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, चाहत्यांना त्याच्याविषयी जाणून घ्यायचे आहे. चाहत्यांना प्रश्न पडला होता, अखेर हा मुलगा आहे तरी कोण, जो थेट डेरिल मिचेलच्या शेजारी जाऊन बसला आहे. आता चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. या लहान मुलाचे नाव जेकब आहे आणि तो सध्या कॅन्सरशी झुंज देतोय. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेकबला संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सामील होण्याची परवानगी दिली होती. न्यूझीलंड क्रिकेटने घेतलेल्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1477830767388422145?s=20

दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकली  आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेने सर्वाधिक १२२ धावांची खेळी केले. तसेच हेन्री निकोल्सने ७५ आणि विल यंगने ५२ धावा करून त्यांचे अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या डावात न्यूझीलंडने ३२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेशनेही अप्रतिम फलंदाजेच प्रदर्शन केले.

बांगलादेशने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सहा विकेट्सच्या नुकसानावर ४०१ धावा केल्या आणि ७३ धावांची आघाडी घेतली. बांगलादेशचे खेळाडू अजूनही खेळपट्टीवर कायम आहेत. बांगलादेशने या सामन्यात केलेले प्रदर्शन पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. बांगलादेशने आशिया खंडाच्या बाहेर शक्यतो खूपच कमी वेळा चांगले कसोटी प्रदर्शन केले आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आशिया खंडाच्या बाहेर प्रथम गोलंदाजी करूनही बांगलादेशने कसोटी सामन्यात आघाडी घतली आहे.

https://twitter.com/kaustats/status/1477847586732052481?s=20

महत्वाच्या बातम्या –

अरेरे! दुखापतीमुळे विराटच्या हातून दवडली मोठी संधी, आता खास ‘शतका’साठी करावी लागणार प्रतिक्षा

कर्णधार बनण्याच्या प्रश्नावर आले स्टोक्सचे उत्तर; म्हणाला, “या जबाबदारीसाठी मी…”

RSA v IND 2nd Test Live: टीम इंडियाला सलग २ धक्के, पुजारापाठोपाठ रहाणे शून्यावर बाद; भारताच्या ३ बाद ४९ धावा

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---