भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 78 धावांवर गारद झाला. किंतु दुसऱ्या डावात भारतीय संघाने अप्रतिम पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 215 धावा केल्या. अत्यंत खराब फॉर्ममध्ये असणारा चेतेश्वर पुजारा 91 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार विराट कोहलीही 45 धावांवर नाबाद राहिला. त्याच्याआधी रोहित शर्माने 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मात्र, या उत्कृष्ट खेळीनंतरही भारतीय संघ इंग्लंडपेक्षा अजून 139 धावांनी मागे आहे. अशात इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू नासेस हुसेनने विराटसेनेला चेतावणी दिली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनने सामन्याचा तिसरा दिवस संपल्यानंतरही हेच सांगितले. हुसेन म्हणाला की, लीड्स मैदानावर भारताला जिंकण्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. ही कोलकाता कसोटी नाही जी भारतीय संघ जिंकू शकेल. भारतीय संघाने 2001 साली कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाचा फॉलोऑन स्वीकारून त्यांचा पराभव केला होता.
सामन्यानंतर नासेर हुसेन म्हणाला, ‘लीड्समधील सामना वाचवण्यासाठी भारताला चौथ्या दिवशीही खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. जर भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर आघाडी घेतल्यानंतर त्यांना 150 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील, जे इतके सोपे नाही. लक्षात ठेवा की हे कोलकाता नाही जिथे खेळाच्या पाचव्या दिवशी चेंडू फिरू शकेल. लीड्समधील ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली राहील. अशा परिस्थितीत इंग्लंडला हरवण्यासाठी खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी आवश्यक असेल.’
नासिर हुसेनने भारतीय संघाच्या कधीही हार न मानण्याची वृत्तीला सलाम केला आहे. तो म्हणाला की, ‘भारतीय संघ हा असा संघ आहे जो कधीही सहजासहजी हार स्वीकारत नाही आणि त्यांनी खेळाच्या तिसऱ्या दिवशी हेच केले.’
‘लोक रोहित शर्माविषयी म्हणत होते की, तो इंग्लंडमध्ये फलंदाजी करू शकत नाही. पण त्याने सर्वांना चुकीचे सिद्ध केले आहे. चेतेश्वर पुजारावरही खूप दबाव होता, पण त्याने अत्यंत अत्यावश्यक प्रसंगी धावा केल्या आहेत. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून मोठ्या धावा येत नव्हत्या. पण त्याने चांगली फलंदाजी केली. तरीही भारताला सामना जिंकण्यासाठी खूप चांगला खेळ दाखवावा लागेल,’ असेही हुसेनने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! लीड्स कसोटीवर कोरोनाचे सावट, इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
हेडिंग्ले कसोटीत भारताची दुर्गति होण्यास कोहलीचा ‘तो’ निर्णय जबाबदार; माजी क्रिकेटरने टोचले कान