---Advertisement---

‘कोरोना हा आता विनोदाचा भाग राहिलेला नाही’, चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूची प्रतिक्रिया

---Advertisement---

भारत कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. ऑक्सिजन, रुग्णालये आणि औषधांचे संकट अनेक राज्यात कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. आयपीएल 2021 स्थगित करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैना याने स्वागत केले आहे.

रैनाने ट्विटमध्ये लिहिले, “हा ( कोरोना) आता विनोद राहिलेला नाही. इतके सारे जीव धोक्यात आले असून, आयुष्यात कधीही इतके असहाय्य वाटले नाही. आम्हाला कितीही मदत करायची इच्छा असली तरी खरे म्हणजे आमच्याकडची संसाधने संपली आहेत. या देशातील प्रत्येक माणूस जीव वाचविण्यासाठी एकमेकांच्या पाठीशी उभा आहे व त्यासाठी सर्वांना सलाम.”

आयपीएल 2021 स्पर्धा सुरु असताना बायोबबलमध्ये असून देखील खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सदस्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळे अखेर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच आयपीएल आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न चिन्ह उभे राहत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ही स्पर्धा भारतात आयोजित करणे हे एक मोठे जोखमीचे काम होते. बीसीसीआयने ही जोखीम स्वीकारली मात्र यात त्यांना अपयश आले आहे.

आता सर्वांच्या नजरा बीसीसीआयकडे लागून राहिल्या असून, आगामी काळात ते आयपीएल संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या –

‘यावेळी संघ फॉर्ममध्ये होता’, फाफ डू प्लेसिसने भावनिक संदेशासह घेतला आयपीएलचा निरोप

आयपीएल स्थगित झाल्यानंतरही ‘या’ कारणामुळे इंग्लंडला जाण्यापूर्वी न्यूझीलंडचे खेळाडू १० मे पर्यंत भारतातच थांबणार

हसी अन् बालाजी कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंवरही कोरोनाचे सावट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---