---Advertisement---

मेड इन इंडिया! आयपीएलमध्ये दूसऱ्यांदाच घडला भारतीयांकडून ‘हा’ अनोखा विक्रम

On: रविवार, सप्टेंबर 27, 2020 11:19 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२०ची सुरुवात होऊन १० दिवस देखील झाले नाहीत, तोपर्यंत खेळाडूंनी एकाहून एक दमदार विक्रम नोंदवायला सुरुवात केली आहे. अशात रविवारी शारजाह येथे किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात पार पडलेल्या आयपीएल २०२०च्या नवव्या सामन्यात अजून एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

झाले असे की, राजस्थान संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या पंजाब संघाने २० षटकात २२३ धावांचा मोठा स्कोर उभा केला. यात पंजाबचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालच्या शतकी खेळीचा समावेश होता. त्याने केवळ ५० चेंडूत १० चौकार आणि ७ षटकार मारत १०६ धावा केल्या आहेत.

यासह आयपीएलच्या तेराव्या हंगामात शतक ठोकणारा तो दूसराच फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने २४ सप्टेंबरला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याने केवळ ६९ चेंडूत नाबाद राहत १३२ धावा ठोकल्या होत्या.

त्यामुळे आजवरच्या १३ हंगामाच्या आयपीएल इतिहासात दूसऱ्यांदाच असं घडलं आहे, जेव्हा हंगामातील पहिली २ शतके ही भारतीय फलंदाजांनी लगावली आहेत. यापुर्वी २०११ साली म्हणजेच आयपीएलच्या चौथ्या हंगामात हा विक्रम नोंदला गेला होता. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि पॉल वल्थटी या २ भारतीय धुरंधरांनी हंगामातील पहिली २ शतके ठोकली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिला आणि एकमेव! एकाही भारतीयाला न जमलेला ‘हा’ पराक्रम मयंकने केलाय, पाहा कामगिरी

ही दोस्ती तुटायची नाय! बालपणीची जोडी मैदानावरही चमकली, एकाच खेळीत अनेक विक्रम नावावर

यूएईतील ‘या’ मैदानावर गोलंदाजी? नको रे बाबा

ट्रेंडिंग लेख-

असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज

हैदराबादला चीतपट करणाऱ्या कोलकाता संघाचे हेच ते ‘पाच महारथी’

सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---