---Advertisement---

यूएईतील ‘या’ मैदानावर गोलंदाजी? नको रे बाबा

On: रविवार, सप्टेंबर 27, 2020 9:37 PM
---Advertisement---

भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएईमध्ये केले आहे. त्यामुळे आयपीएलचे सर्व सामने युएईच्या शारजाह, दुबई आणि अबु धाबी या ३ ठिकाणी खेळण्यात येत आहेत.

१९ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या हंगामाचे आतापर्यंत एकूण ८ सामने पार पडले आहेत. तर रविवारी शारजाह येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा नववा सामना झाला. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने या सामन्यात नाणेफेक जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवालने सलामीला फलंदाजीसाठी आले. दरम्यान या दोन्ही धुरंधर फलंदाजांनी एकूण ८ षटकार ठोकले.

त्यामुळे शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे आतापर्यंत पार पडलेल्या २ सामन्यात फलंदाजांनी सर्वाधिक ४१ षटकार मारण्याचा भीमपराक्रम केला आहे. यात आजच्या सामन्यातील ८ आणि यापुर्वी राजस्थान विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळण्यात आलेल्या चौथ्या आयपीएल सामन्यातील ३३ षटकारांचा समावेश आहे.

तसेच अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ३ सामने खेळण्यात आले आहेत. त्यात फलंदाजांनी ३३ षटकार मारले आहेत. तर आतातपर्यंतचे सर्वाधिक सामने हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे झाले आहेत. या मैदानावर सर्वाधिक ४ सामने होऊनही फलंदाजांनी इतर २ मैदानांच्या तुलनेत कमी षटकार ठोकले आहेत. या मैदानावर फलंदाजांनी ३२ षटकार मारले आहेत.

आयपीएल २०२०मध्ये ठिकाणानुसार मारण्यात आलेले षटकार-
शारजाह- २ सामने, ४१ षटकार
अबु धाबी- ३ सामने, ३३ षटकार
दुबई- ४ सामने, ३२ षटकार

महत्त्वाच्या बातम्या-

हैदराबादला चीतपट करणाऱ्या कोलकाता संघाचे हेच ते ‘पाच महारथी’

२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ‘त्याचे’ स्वप्न झाले पूर्ण, आयपीएलच्या आठव्या सामन्यातून केले पदार्पण 

‘हा’ खेळाडू टीम इंडियाकडून तीनही स्वरूपात खेळताना दिसेल, दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने व्यक्त केली आशा

ट्रेंडिंग लेख-

सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम

आयपीएलमध्ये ‘या’ संघांनी केल्यात सर्वाधिक वेळा २०० धावा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १६- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---