मुंबई। काल(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात तिसरा टी20 सामना(3rd T20I) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
भारताच्या या विजयात केएल राहुल(KL Rahul), रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहली(Virat Kohli) या तिघांनीही अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. राहुलने 56 चेंडून 91 धावा केल्या, तर रोहितने 34 चेंडूत 71 धावा केल्या आणि विराटने 29 चेंडून नाबाद 70 धावांची खेळी केली.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात एका डावात 3 फलंदाजांनी 70 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी(three batsmen scoring 70-plus runs in a T20I innings) करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी टी20 मध्ये असे कधीही झाले नव्हते.
रोहित, विराट आणि राहुल या तिघांनी केलेल्या अर्धशतकांमुळे भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद तब्बल 240 धावांचा डोंगर रचला होता. त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 20 षटकात 8 बाद 173 धावाच करता आल्या.
…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!
वाचा????https://t.co/V3AX2zBxo0????#म #मराठी @BeyondMarathi @Mazi_Marathi #cricket #HappyBirthdayYuvi— Maha Sports (@Maha_Sports) December 12, 2019
हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!
वाचा???? https://t.co/Ek7dc0prAY????#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #HappyBirthdayYuvi— Maha Sports (@Maha_Sports) December 12, 2019






