---Advertisement---

काय सांगता! रोहितने आत्तापर्यंत विराट शिवाय खेळला नव्हता एकही कसोटी सामना

On: गुरूवार, जानेवारी 7, 2021 4:10 PM
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु आहे. यासामन्यातून भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याला मागील काही सामने दुखापतीमुळे मुकावे लागले होते. पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याने पुनरागमन केले आहे.

सिडनीतील सामना रोहितचा कारकिर्दीतील ३३ वा कसोटी सामना आहे. विशेष म्हणजे रोहित त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच विराटच्या अनुपस्थितीत कसोटी सामना खेळत आहे. रोहितने याआधी खेळलेल्या सर्व ३२ कसोटी सामन्यात विराटचाही समावेश होता. त्यामुळे रोहितने त्याच्या कारकिर्दीत विराटसह सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत.

विराट पाठोपाठ अजिंक्य रहाणे आहे. रोहितच्या कारकिर्दीतील ३३ कसोटी सामन्यांपैकी २९ सामन्यात रहाणेचा समावेश होता.

रोहित १४ महिन्यांनंतर खेळतोय कसोटी क्रिकेट – 

रोहित याआधी शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो साल २०२० च्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेट खेळता आले नाही. त्यामुळे तब्बल १४ महिन्यांनंतर रोहित कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. याबरोबरच अजिंक्य रहाणेने विराटच्या अनुुपस्थितीत नेतृत्वाची धूरा सांभाळल्याने रोहितकडे भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

विराट पालकत्व रजेवर –

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली सध्या पालकत्व रजेवर आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेतली होती. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या महिन्यात त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

रोहितचे कसोटी कारकिर्दीतील ३३ सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा संघसहकारी राहिलेले खेळाडू –
३२ सामने – विराट कोहली
२९ सामने – अजिंक्य रहाणे
२८ सामने – चेतेश्वर पुजारा
२७ सामने – आर अश्विन
२४ सामने – मोहम्मद शमी

महत्त्वाच्या बातम्या –

पदार्पणवीर! सैनीने पहिल्याच कसोटी सामन्यात पुकोस्कीची विकेट घेतल्याने झाला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड

रिषभ पंतकडून झेल सुटला आणि पुकोवस्की आऊट होता-होता वाचला, पाहा व्हिडिओ

“मी आयुष्यभर लक्षात ठेवेल”, गांगुलीने आपल्या खास मित्राप्रती व्यक्त केली कृतज्ञता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---