भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून नवदीप सैनीने आणि ऑस्ट्रेलियन संघाकडून विल पुकोस्कीने आपले कसोटी पदार्पण केले आहे. गमतीशीर बाब म्हणजे सैनीनेच पुकोस्कीला बाद केले आहे. त्यामुळे एक अनोखा विक्रम झाला आहे.
सैनीने पुकोवस्कीला 35 व्या षटकात पायचीत केले. त्यामुळे पुकोस्कीला 110 चेंडूत 62 धावा केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
भारतीय क्रिकेट इतिहासात एखाद्या पदार्पण करणाऱ्या खेळाडूने दुसऱ्या पदार्पण करणाऱ्या खेळाडूला बाद करण्याची ही केवळ पाचवीच वेळ आहे.
या पूर्वी 1946 साली विजय हजारे यांनी एरिक बेडसर या इंग्लंडच्या खेळाडूला बाद केले होते. याच सामन्यात सदाशिव शिंदे यांनी जे टी लिकिनला बाद केले. यानंतर 1987 साली अर्शद अय्युब यांनी विन्स्टन बेंजामिन या वेस्ट इंडिजच्या खेळाडूला बाद केले होते. 2000 साली भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जहीर खानने मेहरब हुसेन या बांगलादेशी खेळाडूला बाद केले. आता या नंतर सैनीने पुकोस्कीचा बळी घेत पाचव्यांदा अशी कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर भारतीय क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे, जेव्हा एका पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाने विरुद्ध संघाच्या पदार्पण करणाऱ्या फलंदाजाने अर्धशतक केल्यानंतर बाद केले.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता पहिल्या दिवसाचा खेळ थांबला असून ऑस्ट्रेलियाने 55 षटकात 2 गडी गमावत 166 धावांपर्यंत मजल मारली आहे. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 55 षटकांचा खेळ झाला असून, क्रिकेटप्रेमींना आशा असेल की कसोटीच्या उर्वरित दिवशी पाऊस अडथळा आणणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतकडून झेल सुटला आणि पुकोवस्की आऊट होता-होता वाचला, पाहा व्हिडिओ
“मी आयुष्यभर लक्षात ठेवेल”, गांगुलीने आपल्या खास मित्राप्रती व्यक्त केली कृतज्ञता
दहा मिनिटात दोन झेल सोडल्याने रिषभ पंतवर चाहत्यांची आगपाखड, मीम्स व्हायरल