---Advertisement---

ती घटना ज्यामुळे विराटला मिळाली आयसीसीकडून शिक्षा, पहा व्हिडिओ

---Advertisement---

रविवारी(22 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात फलंदाजी करत असताना 5 व्या षटकात धाव घेताना भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या(Virat Kohli) खांद्याचा धक्का दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्यूरान हेन्ड्रिक्सला (Beuran Hendricks) लागला.

त्यामुळे आयसीसीने विराटला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 नुसार अधिकृत चेतावणी दिली आहे. तसेच त्याला एक डिमिरिट पॉइंटही (demerit point) दिला आहे.

झाले असे की प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरेल्या भारतीय संघाकडून विराट फलंदाजी करत होता. यावेळी 5 व्या षटकातील एक चेंडू टाकल्यानंतर हेन्ड्रिक्स खेळपट्टीजवळ उभा होता. त्याचवेळी या चेंडूवर धाव घेण्यासाठी पळालेल्या विराटने हेन्ड्रिक्सला खांद्याने धक्का दिला. या धक्क्यानंतर हेन्ड्रिक्सनेही हसून प्रतिक्रिया दिली.

मात्र सामनाधिकाऱ्यांना विराटचे हे वागणे खटकल्याने त्याला 1 डिमिरिट पॉइंट मिळाला आहे.

याबद्दल आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘विराटने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचार संहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. हे कलम खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य, पंच, सामनाधिकारी किंवा अन्य सदस्यांशी अयोग्य पद्धितीने शारिरिक संपर्क केल्याबद्दल आहे.’

सप्टेंबर 2016 मध्ये आयसीसीची सुधारित आचारसंहिता लागू झाल्यापासून विराटला हा तिसरा डिमिरिट पॉइंट मिळाला आहे.

याआधी त्याला 15 जानेवारी 2018 ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान 1 डिमिरिट पॉइंट मिळाला होता. त्यानंतर 2019 विश्वचषकात 22 जूनला त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर 1 डिमिरिट पॉइंट मिळाला होता. आता रविवारीच्या टी20 सामन्यानंतर त्याला तिसरा डिमिरिट पॉइंट्स मिळाला आहे.

रविवारच्या या टी20 सामन्यात भारताला 9 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही 3 सामन्यांच्या टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.

https://twitter.com/AdamDhoni1/status/1175983473099591680

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

अनुभवी तमिळ थलायवाज प्ले-ऑफमधून बाहेर, तर हे दोन संघ प्ले-ऑफसाठी ठरले पात्र

या मोठ्या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंना वगळले…

सुरक्षेच्या भीतीनंतरही श्रीलंकेचा संघ वनडे, टी२० सामन्यांसाठी पाकिस्तानला रवाना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment