आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कबद्दल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथने एक वक्तव्य केलं आहे.
याबरोबरच केकेआरने मिचेल स्टार्कला आयपीएल 2024 च्या लिलावात 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तसेच मिचेल स्टार्क 8 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या इतिहासातील या सर्वात महागड्या खेळाडूला गोलंदाजी पाहण्यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत.
अशातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ यावेळी आयपीएल 2024 च्या लिलावात न विकला गेला. त्यानंतर यावेळी स्मिथ स्पर्धेत कॉमेंट्री करताना दिसणार आहे. स्टीव्ह स्मिथने आयपीएल 2024 मध्ये मिचेल स्टार्कला किती विकेट्स मिळतील याचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत स्मिथ म्हणाला की मला वाटते की स्टार्क नवीन चेंडूने डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करेल. तेव्हा त्याला विकेट मिळण्याची अधिक संघी आहे. तसेच पुढे बोलताना स्मिथ म्हणाला आहे की आयपीएलच्या 17 व्या हंगामात मिचेल स्टार्क 30 विकेट विकेट्स घेईल.
याआधी मिचेल स्टार्क पहिल्यांदा 2014 मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी जोडला गेला होता. तेव्हा तो आरसीबीसाठी 2 हंगाम खेळला असून त्याने यावेळी 34 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर स्टार्क आयपीएलमध्ये खेळला नव्हता. पण त्यानंतर स्टार्क आता आयपीएलमध्ये परतला आहे.
Steve Smith : " Mitchell Starc will be the Top Wicket Taker of IPL 2024"#AmiKKR pic.twitter.com/aVelQOoatV
— Rokte Amar KKR 🟣🟡 (@Rokte_Amarr_KKR) March 22, 2024
दरम्यान, आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हर्षल पटेल आणि ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कागिसो रबाडाचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच 2013 मध्ये, ड्वेन ब्राव्होने चेन्नई सुपर किंग्जसाठी एका हंगामात 32 विकेट घेतल्या होत्या. तर 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेलने सर्वाधिक 32 विकेट घेतल्या होत्या. तर रबाडाने आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 30 विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
- आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
- धोनीने मागच्याच वर्षी दिले होते कॅप्टनसी सोडण्याचे संकेत, पाहा ऋतुराज काय म्हणाला