रविवारी (८ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकची सांगता झाली. भारतासाठीही ही ऑलिम्पिक स्पर्धा सर्वाधिक यशस्वी ठरली. भारताने या स्पर्धेत एकूण ७ पदकं जिंकली. त्यातही युवा भालाभेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकचा शेवट गोड केला. त्याने शनिवारी पुरुषांच्या भालाफेक क्रीडाप्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
कौतुकाचा वर्षाव
नीरजने शनिवारी अंतिम फेरीत ८७.५८ मीटर भाला फेक करत सुवर्णपदक जिंकले. तो भारतासाठी सुवर्णपद जिंकणारा पहिला ऍथलीट ठरला. त्यामुळे त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताभरातून त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले जात असून त्याला विवध क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नीरजची सुवर्णपदक जिंकल्यानंतरची प्रतिक्रिया
नीरजने सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने हातात टोकियो ऑलिम्पिकमधील पदक धरलेला, तसेच रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंबरोबरचे फोटो शेअर केले. तसेच त्याने या फोटोंना कॅप्शन देत म्हटले की ‘ही भावना अजूनही जगत आहे. भारतातून आणि बाहेरुन मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि आशिर्वादाबद्दल धन्यवाद, त्यामुळे मला या स्तरापर्यंत पोहचण्यात मदत झाली. हा क्षण आयुष्यभर माझ्या स्मरणात राहिल.’
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज भारताचा दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी नेमबाज अभिनव बिंद्राने बिजिंग ऑलिंपिक २००८ स्पर्धेत १० मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तसेच नीरज ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ऍथलीट देखील ठरला आहे.
Still processing this feeling. To all of India and beyond, thank you so much for your support and blessings that have helped me reach this stage.
This moment will live with me forever 🙏🏽🇮🇳 pic.twitter.com/BawhZTk9Kk— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 8, 2021
बक्षीसांची खैरात
नीरजच्या सुवर्णमयी कामगिरीबद्दल त्याचे कौतुक तर होत आहेच, याबरोबरच त्याच्यावर बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. त्याला हरियाणा सरकारने ६ कोटी आणि क्लास वनची नोकरी, पजांब सरकारने २ कोटी, बीसीसीआयने १ कोटी, चेन्नई सुपर किंग्सने १ कोटी आणि स्पेशल जर्सी, रेल्वेने ३ कोटी, मणिपूरने १ कोटी, आयओएने ७५ लाख रुपयांची बक्षीसे जाहीर केली आहेत. तसेच आनंद महिंद्रा यांनी एसयूव्ही७०० कार भेट देण्याचे जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलमध्ये अपयश येऊनही गोलंदाजीत फारसा बदल नाही, पण ‘या’ गोष्टीत मात्र बदल केला, बुमराहचा खुलासा
‘फॅब फोर’मध्ये असला तरी स्मिथला चार गोलंदाजांचे येते टेंशन, ‘या’ भारतीयाचाही त्यात समावेश
जुलै २०२१ ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही