नेदरलँडचा माजी लेग स्पिनर गोलंदाज मायकल रिपनला न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या संघात सहभागी केले गेले आहे. न्यूझीलंडचा १५ सदस्यांचा संघ काही दिवसांमध्ये या दौऱ्यासाठी रवाना होईल. न्यूझीलंड क्रिकेटने मंगळवारी (२१ जून) याबाबदीत माहिती दिली आहे. दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड यांचा सामना करेल.
तीस वर्षीय फिरकी गोलंदाज मायकल रिपन (Michael Rippon) २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून न्यूझीलंडला आला होता. त्याने नेदरलँड संघासाठी आतापर्यंत एकूण ३१ सामने केळले आहेत. चालू वर्षाच्या सुरुवातीला त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नेदरलँड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. अवघ्या काही महिन्यात आता तो याच नेदरलँड संघाच्या विरोधात खेळताना दिसणार आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात त्याने नेदरलँडसाठी न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळला. परंतु आता तो नेदरलँड संघाच्या विरोधात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
आयसीसीच्या नियमांमुसार एखादा खेळाडू पूर्व सदस्य राष्ट्रासाठी उपलब्ध असताना देखील एखाद्या संलग्न किंवा सहयोगी राष्ट्राकडून खेळू शकतो. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून याविषयी माहिती दिली आहे. पत्रकात त्यांनी सांगितले की, “आयसीसीचे पात्रता नियन एखाद्या खेळाडूला पूर्व सदस्य राष्ट्रासाठी उपलब्ध असताना संलग्न किंवा सहयोगी राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देतात. परंतु जर त्या खेळाडूला पूर्व सदस्य राष्ट्राच्या संघात सहभागी केले गेले, तर मात्र तो पुढचे तीन वर्ष सहयोगी राष्ट्रासाठी खेळू शकत नाही.”
मायकल रिपल एकटाच न्यूझीलंडच्या संघात नवीन नाहीये. त्यांचा अनकॅप्ड यष्टीरक्षक फलंदाज डेन क्लीलनला देखील पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवडले गेले आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. त्यानंतर संघ एडिनबर्गमध्ये स्कॉटलंडविरुद्ध दोन टी-२० आणि एक एकदिवसीय सामने खेळेल. सर्वात शेवटी त्यांचा सामना नेदरलँड संघाशी होईल. नेदरलँडविरुद्ध न्यूझीलंडला दोनी टी-२० सामने खेळायचे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघाला मोठा झटका!, दिग्गज अष्टपैलू खेळाडूने जाहिर केली क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
रोहित-विराटला ‘ही’ चूक चांगलीच भोवली, बीसीसीआयने फटकारल्याने दोघांच्या अडचणीत वाढ
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा डेविड वॉर्नर ठरला दुसराच खेळाडू