---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ‘या’ पाकिस्तानी खेळाडूने बदलला देश, सर्वाधिक मॅचेसही त्याच्याच नावावर

On: शनिवार, जून 11, 2022 9:44 PM
Azhar-Mahmood
---Advertisement---

पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलेल्या कोणत्या खेळाडूने आयपीएलमध्ये सर्वात जास्त मॅचेस खेळल्या? असा प्रश्न विचारला तर कदाचित याचे उत्तर लवकर सापडणार नाही, तर त्या खेळाडूचे नाव आहे अझहर महमूद. अझहरने आयपीएलमध्ये २३ मॅचेस खेळल्या. तुम्ही म्हणाल काहीही काय सांगता. पहिल्या आयपीएलनंतर पाकिस्तानी प्लेयर कुठे आयपीएलमध्ये खेळले. त्या सिझनला कोणी सगळ्या मॅचेस खेळला असता तरी, १६ मॅचेसच्या वर कोणाचे आयपीएल करियर गेले नसते. मग हा अझहर २३ मॅच कसा खेळला?, पण हे खरं आहे. पाकिस्तानसाठी खेळलेल्या अझहरने हे शक्य करून दाखवलं तेही जुगाड करून.

अझहर महमूद म्हणजे एक वेळेचा पाकिस्तानातील सगळ्यात टॅलेंटेड क्रिकेटर. जवळजवळ ९० टक्के पाकिस्तानी क्रिकेटर जे टेप बॉल क्रिकेट खेळून नावारूपाला आले त्यातील हाही एक. टप्पा धरून बॉलिंग करायला माहीर आणि बॅटिंगमध्ये जबरदस्त स्ट्रायकींग ही त्याची खासियत. १९९६ ला डेब्यू केलेल्या अझहरने अल्पावधीत पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाव कमावलं होतं. २००० मध्ये वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्याला कॅप्टन बनवायचं, असं पाकिस्तानी बोर्डाने ठरवलं, पण एकतर कमी अनुभव आणि टीममध्ये इतर सारे अनुभवी खेळाडू म्हणून, पुढे काही ड्रामा व्हायला नको म्हणून त्यांना कॅप्टन होण्यास नकार दिला. बोर्डाच्या विरोधात गेल्याची किंमत त्याला चुकवावी लागली आणि तो संघातून बाहेर गेला.

हेही पाहा- आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा पाकिस्तानी क्रिकेटर

पाकिस्तान टीममधून बाहेर झाल्यावर अझहरने इंग्लंडच्या काउंटीचा मार्ग धरला. त्यानं सरे काऊंशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं. इथेच त्यांची ओळख झाली इबा कुरेशी या पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश मुलीशी. दोघांचं प्रेम फुलल आणि त्यांनी २००३ मध्ये निकाह केला. आता अजहर पाकिस्तान आणि ब्रिटनचा नागरिक बनला होता.

नंतर २००३ वर्ल्ड कपला त्यान पाकिस्तान टीममध्ये कमबॅक केला. पुढे टेस्ट टीममध्ये त्याला जागा मिळाली. त्याचा परफॉर्मसही व्हायचा पण चान्सेस हवे तितके मिळत नव्हते. २००७ वर्ल्डकपमध्ये ज्यावेळी अब्दुल रज्जाक इंजर्ड झाला तेव्हा अजहरला बोलावले गेले. इथेच तो लास्ट टाइम पाकिस्तानसाठी मोठ्या स्टेजवर खेळताना दिसला.

पुढे अझहर इंग्लंडमध्येच रमला. केंटसाठी इंग्लिश क्वालिफाईड प्लेयर म्हणून खेळू लागला. तिकडे आयपीएल सुरू झाली आणि पहिल्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी प्लेयर्स खेळले, तेव्हा अझहरला चान्स मिळाला नाही. नेमकं २६/११ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला आणि भारत-पाकिस्तानचे क्रिकेट संबंध बिघडले ते कायमचेच. पाकिस्तानी प्लेयर्स आयपीएलमधून बॅन झाले. माजी पाकिस्तानी क्रिकेटर म्हणायचे आमच्या प्लेयर्सला घ्या, पण बीसीसीआयनेही देशापुढे काहीही नाही म्हणत त्यांना गप्प केले.

सन २०११ ला अझहरला ब्रिटिश पासपोर्ट मिळाला आणि तो आता इतर देशांमध्ये इंग्लिश प्लेयर म्हणून खेळायला पात्र झाला. २०१२च्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याचं नाव आलं आणि टीम्स त्याच्यासाठी बोली लावू लागल्या. एक लाख अमेरिकन डॉलर्स बेस प्राईज असलेल्या अझहरला दुप्पट किंमत मोजत किंग्स इलेव्हन पंजाबने आपला किंग बनवले. अशा पद्धतीने २००८ नंतर आयपीएल खेळणारा तो पहिला पाकिस्तानी क्रिकेटर बनला. इंग्लिश मुलीशी लग्न केल्याचा त्याला हा वेगळाच फायदा झाला.

जबरदस्त ऑलराऊंड परफॉर्मन्स देत त्यानं आपला पहिला सीझन गाजवला. पुढच्या सीझनला तो आणखीनच भारी खेळला. अझहर टॉप परफॉर्मन्स करत राहिला, पण २०१४ मेगा ऑक्शनआधी पंजाबला त्याला रिलीज करावं लागलं. नेक्स्ट ऑक्शनमध्ये तो केकेआरचा भाग झाला पण तिथं एकाच मॅचला त्याला संधी मिळाली. इथं फ्लॉप होताच तो आयपीएलमधून बाहेर गेला तो कायमचाच.

अझहरने पुन्हा एकदा पाकिस्तानसाठी खेळायची इच्छा बोलून दाखवली. तसेच आपला दुसरा देश असलेल्या इंग्लंडसाठी देखील त्याला खेळायचे होते, पण या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या नाहीत आणि त्याला रिटायरमेंट घ्यावी लागली. आता अजहर कोच बनलाय. त्याचं कोचिंग हे त्याच्यासारखं भारी होतंय.

पाकिस्तानचा दिगज होऊ शकणारा हा अझहर कॅप्टन्सी न स्वीकारण्याच्या त्या निर्णयामुळे ऍवरेज प्लेयर्समध्ये गणला जाऊ लागला. त्याने अनेक मॅचविनिंग परफॉर्मन्स दिले असले तरी, तो आजही ओळखला जातोय तो फक्त सगळ्यात जास्त आयपीएल मॅच खेळणारा पाकिस्तानी म्हणूनच.

आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा पाकिस्तानी क्रिकेटर | Azhar Mahmood | Pakistani Cricketer | IPL

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

अंडर- १९ एका देशासाठी अन् इंटरनॅशनल क्रिकेट दुसऱ्या देशाकडून खेळलेले बहाद्दर, यादीत मुंबईकर पठ्ठ्याही सामील

शारीरिक व्यंगावर मात करत ‘हे’ ५ क्रिकेटर्स बनले दिग्गज, टीम इंडियाच्या २ खेळाडूंचा समावेश

विषये का! चक्क टी२० क्रिकेटमध्येही डबल सेंच्युरी ठोकण्याचा दम राखणारे ४ क्रिकेटर्स, एक भारतीयही सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---