---Advertisement---

‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटर्सही खेळलेत आयपीएल, जाणून घ्या एका क्लिकवर

On: गुरूवार, जून 9, 2022 3:22 PM
Shoaib-Akhtar
---Advertisement---

आयपीएलचा पंधरावा सीजन संपलाय. यात मुंबई-चेन्नईची गाडी रुळावरून घसरली अन् नवखा गुजरात टॉपला पोहोचला तसेच त्यांनी ट्रॉफीही पटकावली. सालाबादप्रमाणे जशी आयपीएल भरते तशी एक चर्चा पण होते, ती म्हणजे यावर्षी आयपीएलमध्ये पाकिस्तानी प्लेयर पाहिजेत की नाही. बाबर आझम, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद रिजवान, शादाब खान हे असे काही करंट पाकिस्तानी प्लेयर आहेत, जे कोणत्याही टीममध्ये सहज फिट होऊ शकतात. पाकिस्तानी प्लेयर आयपीएलमध्ये खेळायचे म्हणजे पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडाव्या लागतील. पाकिस्तानी क्रिकेटची एक पिढी रिटायर झाली, पण त्यांच्या नशिबी आयपीएल टीमची जर्सी आली नाही. या प्लेयर्सना आयपीएलचे मैदान गाजवायची संधी मिळाली नसली तरी, पहिल्या आयपीएलमध्ये मात्र जवळपास साऱ्याच टॉप पाकिस्तानी प्लेयर्सनी सहभाग नोंदविलेला.

सन २००८च्या पहिल्या आयपीएलला ११ पाकिस्तानी प्लेयर्स खेळलेले. २००८ला मुंबईभर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने पाकिस्तानी प्लेयर्सला आयपीएलचे दरवाजे कायमचे बंद झाले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच पाकिस्तानी दिग्गजांविषयी माहीत करून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये आपली उपस्थिती दर्शविली.

आयपीएल आणि पाकिस्तानी प्लेयर हा विषय जेव्हा निघतो, तेव्हा सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे सोहेल तन्वीरचे. आपल्या आगळावेगळ्या बॉलिंग एक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या तन्वीरने पहिल्या सीझनमध्ये अशी कामगिरी केली. ज्यामुळे त्याचे नाव आयपीएलच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले. तन्वीरचा हात असा काही चालला की सगळ्यात जास्त विकेट घेऊन त्याने ऑरेंज कॅपच पटकावली. राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनविण्यात तो खऱ्या अर्थाने किंगमेकर होता. १४ रन्स देत ६ विकेट्स घेण्याचा त्याचा परफॉर्मन्स दहा वर्ष अबाधित होता. इतकेच नव्हे, तर आयपीएल फायनलला विनिंग रन्स मारायचे सौभाग्य त्यालाच लाभले.

हेही पाहा- आयपीएल गाजवलेले पाकिस्तानचे ५ शिलेदार, एकाने तर जिंकलीय आयपीएल ट्रॉफी

टी२० क्रिकेट हे नाव कोणाला माहित नसेल तेव्हापासून जो बॅटर फक्त तोडफोड बॅटिंग करायचा तो बॅटर म्हणजे शाहिद आफ्रिदी. हाच आफ्रिदी २ कोटी ७१ ची घसघशीत रक्कम मिळवत त्या वर्षीचा सर्वात महागडा पाकिस्तानी ठरला. आफ्रिदी सर्वात स्ट्रॉंग डेक्कन चार्जर्स टीमचा भाग होता पण टीम लास्ट राहिली. जी रेपुटेशन आणि रक्कम घेऊन आफ्रिदी आला, तसा परफॉर्मन्स मात्र त्याचा काही झालाच नाही. १० मॅचला ८१ रन अन् ९ विकेट असा अतिसामान्य परफॉर्मन्स त्याच्या नावाला न्याय देऊ शकला नाही. पुन्हा कमबॅक करून आयपीएल गाजवायचे त्याचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले.

पहिल्या आयपीएलला ज्या ११ पाकिस्तानी प्लेयर्सला संधी मिळाली त्यापैकी एक नाव होते वेगाचा बादशहा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरचे. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने चार पाकिस्तानी प्लेयर्सवर विश्वास दाखवलेला त्यापैकी एक अख्तर होता. अख्तर सुरुवातीपासूनच अनफिट होता.. निम्मा सीजन झाल्यावर दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध त्याने असा काही आयपीएल डेब्यू केला जो संस्मरणीय बनला. ११ रन्स देत ४ विकेट घेत त्याने बेस्ट आयपीएल डेब्यू परफॉर्मन्स दिला, पण नंतर पुन्हा इंजर्ड झाला आणि फक्त ३ मॅच खेळू शकला. त्यानंतर तो पुन्हा कधी आयपीएलच्या मैदानावर दिसलाच नाही.

आज टी२० क्रिकेटच्या इतिहासातील टॉप फाईव्ह प्लेयरची लिस्ट काढली तर त्यात एक नाव असेल शोएब मलिकचे. चाळीशी गाठलेला मलिक अजूनही क्रिकेट खेळतो. त्यावेळी शोएब मलिकला दिल्लीने दोन कोटी देत आपल्या बॅटिंग लाईनअपचा भाग बनवलेले, पण सात मॅचला चान्स देऊनही त्यावेळी तो पुरता फ्लॉप ठरला.

पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलेल्या कोणत्या खेळाडूने आयपीएलमध्ये सर्वात जास्त मॅचेस खेळल्या? असा प्रश्न विचारला तर कदाचित याचे उत्तर लवकर सापडणार नाही, तर त्या खेळाडूचे नाव आहे अझर मेहमूद. आधी पाकिस्तानसाठी अन नंतर इंग्लंडसाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला मेहमूद इंग्लिश पासपोर्टमुळे किंग्स इलेव्हन पंजाब आणि केकेआरसाठी २३ मॅच खेळला. एखाद दोन मॅच सोडल्या, तर मेहमूदही इतर पाकिस्तानी प्लेयरसारखा इम्प्रेस करू शकला नाही आणि आयपीएल खेळणारा पाकिस्तानी क्रिकेटर बनला.

आयपीएल गाजवलेले पाकिस्तानचे ५ शिलेदार, एकाने तर जिंकलीय आयपीएल ट्रॉफी | Pakistani Players in IPL

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सला IPL 2022मध्ये मिळालाय ‘हिरा’, तो ‘बेबी एबी’ नाव सार्थ करणारंच!

रेल्वेत ‘गँगमन’ ते आयपीएल टीम्सचा ‘लकी चार्म’, वाचा एका दिवसात करोडपती बनलेल्या कर्णबद्दल

इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---