जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी त्या व्यक्तीचे नाव घेतले आहे. जी व्यक्ती बुमराहच्या आयुष्यात आल्यानंतर बुमराहचा खेळ आणखी सुधारला आहे. हे अजून दुसर कोणी नाही, तर बुमराहचा मुलगा अंगद हा आहे. 34 वर्षीय क्रीडा पत्रकाराने मोमेंट ऑफ सायलेन्स पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान सांगितले की, ‘अंगदच्या जन्मानंतर जसप्रीत बुमराह एक चांगला क्रिकेटपटू बनला आहे. जेव्हा तुमच्याकडे परतण्यासाठी एक शांत घर असते, जिथे तुम्ही फक्त वडील आणि पतीची भूमिका बजावू शकता, तेव्हा ते तुम्हाला खूप मदत करते.
गेल्या काही वर्षांपासून बुमराह स्टार खेळाडू क्रिकेटच्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. तो सातत्याने टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरत आहे. जेव्हा संघाला गंभीर परिस्थितीत विकेट्सची आवश्यकता असते तेव्हा कर्णधार थेट त्यांच्याकडे वळतो. 31 वर्षीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत कर्णधार आणि व्यवस्थापनाचा विश्वासही कायम ठेवला आहे. महत्त्वाच्या प्रसंगी, त्याने अनेक वेळा विकेट्स घेऊन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सध्या जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. इथेही कर्णधारासह चाहत्यांना त्याच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा आहे. इंग्लंडच्या भूमीवर बुमराहचा कहर पाहायला मिळाला तर भारतीय संघाचा विजय जवळजवळ निश्चित आहे.






