भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी सध्या आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते. त्याचबरोबर सर्वात मोठी आवड अर्थातच छंद म्हणजे नवनव्या गाड्यांचे कलेक्शन करणे. सुट्टीच्या कालावधीत धोनी त्याचा हा छंदही जपत आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. चला तर पाहूया, असे काय आहे त्या फोटोत?
धोनीच्या बाईक आणि कारच्या कलेक्शनबद्दल नेहमीच चर्चा होत असते. मागील काही दिवसांपूर्वीच धोनीची पत्नी साक्षीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यात धोनीच्या व्हिंटेज कारचे कलेक्शन दिसून आले होते. या महिन्याच्या शेवटी धोनीने आपल्या लग्नाच्या 11 व्या लग्नाच्या वाढदिनानिमित्त साक्षीला व्हिंटेज कार भेट म्हणून दिली होती.
धोनीचा जो फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामध्ये तो त्याचा मित्र सीमंत लोहानीसोबत दिसत आहे. या फोटोत धोनी आणि सीमंत एकत्र जेवण करत आहेत. धोनीबरोबर त्याच्या मागे असलेली चकाकणारी नवीकोरी व्हिंटेज कारही दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांचे असे मत आहे की, धोनीने रोल्स रॉयसची एक विंटेज कार खरेदी केली आहे.
https://www.instagram.com/p/CROvmNQrBRa/?utm_source=ig_web_button_share_sheet
धोनीने या महिन्यातील 7 तारखेला आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता फक्त आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानावर दिसतो आहे. त्याने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2019 मध्ये खेळला होता, जो 2019 चा विश्वचषक उपांत्य फेरी सामना होता. या सामन्यामध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.
आता धोनी आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या उर्वरित सामन्यांत खेळताना दिसणार आहे. हे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून यूएईमध्ये पार पडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात! इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत आझमचे ‘विश्वविक्रमी’ शतक, कोहली-वॉर्नरलाही सोडले मागे
ख्रिस गेलने बॅटवरून का हटवले ‘युनिव्हर्स बॉस’चे स्टिकर? ऐका त्याच्याच तोंडून