आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धा आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. त्यातच आयपीएलचा 69वा सामना हा पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स (PBKS vs Mi) या दोन संघात खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला 7 विकेट्सने सामना गमवावा लागला आहे.(Mumbai Indians lost the match by 7 wickets)
मुंबई इंडियन्ससाठी जोश इंग्लिस हा खेळाडू खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरला कारण त्याने पंजाब किंग्ससाठी अर्धशतकी खेळी केली. जोश इंग्लिसने 42 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटाकारांसह 73 धावा केल्या आणि पंजाबचा विजय निश्चित करण्यासाठी त्याने शानदार कामगिरी केली. त्याचबरोबर पंजाबसाठी प्रियांश आर्यने 35 चेंडूत 62 धावा करत 9 चौकार आणि 2 षटकार अशी पारी खेळली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 16 चेंडूत 26 धावा केल्या आणि षटकारासह संघाला 18.3 षटकांत 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.
Fifty for Josh Inglis! He took 29 deliveries to reach the landmark. ????pic.twitter.com/pcA04AYmBk
— Cricket.com (@weRcricket) May 26, 2025
या विजयाबरोबर पंजाब किंग्स (Punjab king’s) क्वालिफायर 1 मध्ये पोहोचला आहे(Punjab Kings have reached Qualifier 1). श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबने या हंगामात शानदार प्रदर्शन केले आहे.
पंजाबने 7 विकेट्सने मुंबईचा पराभव करत आता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबीचा (RCB) अखेरचा सामना आता लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध असणार आहे. पण पंजाबने क्वालिफायर वनसाठी आपली जागा निश्चित केली आहे.





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा