---Advertisement---

सूर्यकुमारची नेट्समध्ये ‘३६० डिग्री’ फटकेबाजी, जबरदस्त शॉट मारत अश्विनलाही टाळ्या वाजवायला पाडले भाग

Team India Net Practice Ahead of INDvsPAK match
---Advertisement---

भारतीय संघ एशिया कप (Asia Cup)२०२२साठी दुबईला पोहोचला आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघाचा कसून सराव सुरू आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंनीही सलग दुसऱ्या दिवशी नेटमध्ये चांगलाच घाम गाळला आहे. यावेळी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा एका अनोख्या अंदाजात दिसला आहे. त्याने नेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाजीचा सराव केला त्यावरून तो भलताच लयीत वाटत आहे.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने नेटमध्ये जबरदस्त फलंदाजीचा सराव केला आहे. त्याने फिरकीपटूंपासून ते वेगवान गोलंदाजापर्यंत सगळ्यांच्याच चेंडूवर उत्तम शॉट्स खेळले आहेत. या स्पर्धेसाठी नेमलेले भारताचे मुख्य प्रशिक्षक वीवीएस लक्ष्मण यांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले. सूर्यकुमारच्या फलंदाजीचा व्हिडिओ पाकटीव्ही डॉट टीव्हीने आपल्या युट्युब चॅनलवर अपलोड केला आहे.

अश्विनची धुलाई, तरीही त्याने वाजवल्या टाळ्या
सूर्यकुमारने फलंदाजीचा सराव करताना रविचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार हे गोलंदाजी करत होते. व्हिडिओच्या सुरूवातीलाच दिसून येते की, अश्विनच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला सूर्यकुमारने कशाप्रकारे हवेत उत्तुंग शॉट लगावला आहे. अश्विननेही त्याचा हा शॉट पाहून टाळ्या वाजवल्या आहेत. तसेच त्याने रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवरही स्कूप शॉट खेळला आहे. त्याने अधिक वेळ फलंदाजीचा सराव करत गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

सूर्यकुमारने मोठ्या काळापासून स्थानिक क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विशेष कामगिरी केली आहे. नंतर त्याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले असून तो आता भारताच्या टी२० संघाचा महत्वाचा सदस्य बनला आहे. भारतात त्याच्या फलंदाजीचे चाहते आहेतच त्याचबरोबरच पाकिस्तानमध्येही त्याच्या फलंदाजीचे चाहते आहेत.

Indian 360 Surya Kumar Yadav batting training

पाकिस्तानमध्येही सूर्याच्या फलंदाजीचे चाहते
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी नुकतेच सूर्यकुमारच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले, मला आता विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांच्यापेक्षा सूर्यकुमारची फलंदाजी पाहणे मला अधिक आवडते. अक्रम जेव्हा आयपीएलच्या कोलकाता नाइट राइडर्सचे प्रशिक्षक होते तेव्हापासूनच ते सूर्यकुमारला ओळखतात.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---