जून महिन्यात क्रिकेटशौकिनांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. १८ जून ते २२ जून या कालावधीत इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम, साउथम्टपन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात हा सामना रंगणार आहे. या ५ दिवसीय सामन्यानंतर न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. याबाबत त्याने स्वत: घोषणा केली आहे.
३५ वर्षीय वॅटलिंगने न्यूझीलंड क्रिकेटशी बोलताना सांगितले की, “हीच योग्य वेळ आहे. न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणे आणि विशेष रुपात न्यूझीलंडच्या कसोटी संघाची जर्सी घालणे हा मोठा सन्मान आहे. कसोटी क्रिकेट हे वास्तवात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे शिखर आहे. मला तसेही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करुन बाहेर फिरायला खूप आवडते. पाच दिवस कसोटी सामना खेळल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये संघ सहकाऱ्यासोबत वेळ घालवण्याची मजाच वेगळी असते. निवृत्तीनंतर मला या सर्व गोष्टींची आठवण येईल.”
वॅटलिग हा वर्तमान न्यूझीलंड संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाने २००९ साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने न्यूझीलंडकडून ७३ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान ३८.११ च्या सरासरीने त्याने ३७७३ धावा केल्या आहेत.
Breaking: BJ Watling announces retirement from all forms of cricket, effective after NZ's tour of England.https://t.co/CSJLkrFjfj pic.twitter.com/3Xc5UuNKcB
— Cricbuzz (@cricbuzz) May 11, 2021
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला अधिक संधी मिळाली नाही. परंतु मिळालेल्या संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडत त्याने दमदार कामगिरी केली आहे. २८ वनडे सामने खेळताना त्याने ५ अर्धशतकांच्या मदतीने ५७३ धावा केल्या आहेत. दरम्यान ९६ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे. तसेच टी२० क्रिकेटमध्ये त्याने ५ सामने खेळताना ३८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-कोहली नव्हे तर ‘हे’ ३ खेळाडू ठरू शकतात कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये सामनावीर पुरस्काराचे मानकरी
‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य