भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार (Virat Kohli Resigns) झाला आहे. खूप दिवसांनंतर कोहली तिन्ही फाॅरमॅटमध्ये फक्त खेळाडू म्हणुन खेळणार आहे. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय कसोटी संघाला नविन कर्णधार मिळणार आहे. आता सर्वांचे लक्ष भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा कर्णधार कोण? याकडे लागले आहे.
या पदाचा सर्वात मोठा दावेदार केएल राहुल (KL Rahul) असणार आहे. कारण बीसीसीआयला सुद्धा बाकी संघांसारखा प्रत्येक फाॅरमॅटचा वेगळा कर्णधार हवा आहे. रोहित शर्मा दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांचा कर्णधार आहे, त्यामुळे त्याला कसोटी कर्णधारपद दिले जाणार नाही. पण कसोटी संघाचा कर्णधार केएल राहुलला बनवल्यास एका स्टार खेळाडूची कारकीर्द तरुण वयातच संपुष्टात येईल.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव।
केएल राहुल कसोटी कर्णधार झाला तर एका स्टार खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येईल आणि सलामीवीर म्हणुन त्याचे संघातील स्थान निश्चीत होईल. जर राहुलचे संघातील स्थान निश्चीत झाले तर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅ(Prithvi Shaw) ची कारकिर्द संपुष्टात येईल. २२ वर्षीय फलंदाज पृथ्वी शाॅ एक शानदार सलामीवीर असला तरी गेल्या एक वर्षापासुन तो कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी तळमळत आहे. राहुल कर्णधार झाला तर शाॅला संधी मिळणे आणखी कठीण होईल. त्यामुळे राहुलने पुढील कसोटीचा कर्णधार (Captain KL Raul) व्हावे असे पृथ्वी शाॅला वाटणार नाही.
पृथ्वी शाॅला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी अगोदरच खुप कष्ट घ्यावे लागले आहेत. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धात त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली होती. त्या कसोटीच्या दोन्ही डावात पृथ्वी शाॅ फ्लाॅप ठरला होता. त्यानंतर त्याला संघातुन वगळण्यात आले. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर शाॅला संघात स्थान मिळाले, पण त्याला प्लेईंग इलेवनमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे जर राहुल कर्णधार झाल्यास हा प्रवास आणखी कठीण होईल.
असे म्हटले जात आहे की, रोहित कसोटी कर्णधार बनू शकत नाही, कारण बीसीसीआयला तिन्ही फाॅरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार हवे आहेत. रोहितचे वय ३५ वर्ष आहे. या वयापर्यंत अनेक क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा करतात. त्यामुळे भविष्याचा विचार केला तर रोहितला कर्णधार बनवणे योग्य होणार नाही. रोहित कसोटी संघाचा उपकर्णधार आहे आणि तेच पद त्याच्यासाठी योग्य आहे.
हेही वाचा- कोहलीला ‘सेंच्यूरी किंग’ न बनण्याचा नेहमीच राहणार मलाल! पाँटिंगच्या बड्या विक्रमांना मात्र ‘जीवनदान’
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सेंचुरियरनमधील पहिला सामना भारताने १२३ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर केपटाउन आणि जोहान्सबर्ग येथील दोन्ही सामने गमावत मालिका २-१ ने गमावली. या पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट विश्व हादरले.
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६८ सामने खेळले असुन त्यापैकी ४० सामने जिंकले असुन १७ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जाता जाता ‘या’ ५ खेळाडूंची कारकीर्द घडवून गेला विराट, एकटा आता घेऊ पाहतोय त्याचीच जागा!
विराट अजूनही ऍड आणि कॉर्पोरेट वर्ल्डचा आहे ‘संघनायक’, वर्षाची कमाई ऐकून विस्फारतील डोळे
कोहलीच्या नेतृत्त्वासोबत ‘या’ क्रिकेटर्सच्या कारकिर्दीचीही झाली अखेर! नवा कर्णधार देऊ शकतो नारळ
हेही पाहा-