Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाता जाता ‘या’ ५ खेळाडूंची कारकीर्द घडवून गेला विराट, एकटा आता घेऊ पाहतोय त्याचीच जागा!

जाता जाता 'या' ५ खेळाडूंची कारकीर्द घडवून गेला विराट, एकटा आता घेऊ पाहतोय त्याचीच जागा!

January 17, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Mohammad-Siraj

Photo Courtesy: Twitter/BCCI


विराट कोहलीने (Virat Kohli)  कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून अखेर पायउतार केला आहे. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर काही दिवसांपूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. विराट कोहली हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली. जर विराट कोहली नसता, तर कदाचित हे ५ खेळाडू भारतीय संघाला लाभले नसते. कोण आहेत ते खेळाडू चला पाहूया.

व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव

१) मोहम्मद सिराज (mohammad siraj) : मोहम्मद सिराज हा भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. तो सध्या भारतीय कसोटी संघासाठी मोलाची भूमिका बजावतोय. कोणी ही कल्पनाही केली नसेल की, तो भारतीय संघासाठी मोलाची भूमिका पार पाडेल. त्याची कारकीर्द पाहता असा अंदाज व्यक्त केला होता की, त्याची कारकीर्द लवकरच संपुष्टात येईल. पण त्याने २०२० ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आता तो भारतीय संघातील मुख्य गोलंदाज आहे.

२) केएल राहुल (Kl Rahul) : भारतीय संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणखी एक खेळाडू मिळाला तो म्हणजे केएल राहुल. २०१४ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली केएल राहुलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. तो आपल्या कारकीर्दीत अनेकदा फ्लॉप ठरला. परंतु विराट कोहलीने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला होता. सध्या तो भारतीय संघातील एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे की, केएल राहुलला कसोटी संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.

३) रिषभ पंत (Rishabh pant) : एमएस धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय संघाला एका चांगल्या यष्टिरक्षक फलंदाजाची आवश्यकता होती. त्यानंतर वृद्धिमान साहा सह रिषभ पंतला देखील संधी दिली जाऊ लागली होती. कारकीर्दीच्या सुरुवातीला तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. तरीदेखील विराट कोहलीने कर्णधार म्हणून त्याच्यावरील विश्वास कमी होऊ दिला नाही. आता तो क्रिकेटविश्वातील घातक यष्टिरक्षक फलंदाजांपैकी एक आहे.

४) जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) : जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. सध्या हा खेळाडू कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

५) रोहित शर्मा (Rohit Sharma)  : हे ऐकताना थोडं वेगळं वाटेल की, विराट कोहलीमुळे रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली. परंतु हे सत्य आहे. वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. तरीदेखील विराट कोहलीने त्याला संधी दिली. मध्यक्रमात फलंदाजी करता करता त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले.

महत्वाच्या बातम्या :

VIDEO: क्रिकेटजगतात झाले ‘बेबी एबी’चे आगमन; भारताविरुद्ध दाखवला फलंदाजीचा ट्रेलर

गावसकरांना रोहित नव्हे तर ‘या’ शिलेदारात दिसतोय भावी कसोटी कर्णधार, कारणासहित सांगितले नाव

हे नक्की पाहा:


Next Post
KL Rahul

अगग! राहूल कर्णधार बनताच वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' स्टार क्रिकेटरच्या कसोटी कारकिर्दीवर लागणार ब्रेक

Harbhajan-Singh

हरभजन सिंगने निवडली त्याची 'ऑल टाइम इलेव्हन'; विराटला जागा दिली, पण नेतृत्त्वपद नाही

Rohit Sharma

खुद्द रोहितच कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लावण्यात बनतोय अडथळा, पण कसं? वाचा सविस्तर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143